अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ

By Admin | Updated: May 30, 2015 09:07 IST2015-05-30T01:21:56+5:302015-05-30T09:07:20+5:30

न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने जन्मठेपेचा कैदी डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याची फौजदारी रिट याचिका मंजूर करून पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ केली.

Increase in Arun Gawli parole till 12th June | अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ

अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने जन्मठेपेचा कैदी डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याची फौजदारी रिट याचिका मंजूर करून पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ केली.
अरुण गवळीला मुलाच्या लग्नासाठी पॅरोलची मुदत २१ मेपर्यंत होती. १३ मे रोजी त्याने वृद्ध आईच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पॅरोल ३० दिवसांनी वाढवून देण्याची विनंती अर्ज नागपूर विभागीय आयुक्तांकडे केला होता. त्यावर तातडीने निर्णय न घेतल्याने त्याने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्याला २९ मेपर्यंत दिलासा दिला होता. पण उत्तरासाठी राज्य सरकारला नोटीस जारी केली होती. शुक्रवारी गवळीच्या वकिलांचा आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून गवळीची याचिका मंजूर केली.

Web Title: Increase in Arun Gawli parole till 12th June