शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांच्या अपघाती मृत्यूंत वाढ

By admin | Updated: January 30, 2015 03:59 IST

जिल्ह्यातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व जंगलांतील संपुष्टात येत असलेले भक्ष्य, जानेवारीतच आटलेले पाणवठे व बिबळ्यांची वाढलेली संख्या यामुळे बिबळे

नंदकुमार टेणी,  ठाणेजिल्ह्यातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व जंगलांतील संपुष्टात येत असलेले भक्ष्य, जानेवारीतच आटलेले पाणवठे व बिबळ्यांची वाढलेली संख्या यामुळे बिबळे अपघातात मरण पावण्याचे तसेच मनुष्यवस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील सर्वाधिक बिबटे हे ठाणे जिल्ह्यातील जंगलांत आहेत. ऊसतोडीचा हंगाम संपला की, प्रजोत्पादनासाठी नगर, पुणे, मराठवाडा, सोलापूर येथील उसात दडलेले बरेचसे बिबटे या जंगलात येतात. जंगलातील प्रजोत्पादनामुळे देखील त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत या जंगल क्षेत्रातील भक्ष्य अत्यंत घटले आहे. तसेच या जंगलात निसर्गनिर्मित आणि वनखात्याने निर्माण केलेले पाणवठेदेखील आटल्यामुळे बिबळ्यांना जंगलाबाहेर येणे भाग पडत आहे. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधार्थ बिबटे महामार्गांच्या जवळ येतात. वाहनांचे कर्कश प्रेशर हॉर्न त्यांना दचकावतात व ते बिथरतात. वाहनांना लावलेल्या प्रखर एलईडी डीपरमुळे त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी येते आणि ते चवताळतात. त्यामुळे अनेकदा समोर वाहन दिसत असतानाही ते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि जखमी होतात, असा वनखात्याचा निष्कर्ष आहे. एकीकडे नैसर्गिकरीत्या बिबट्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे त्यांचे विषबाधा वा वाहनांच्या धडकेमुळे मृत्यू होऊ लागले आहेत. याबाबत, वनखात्याने तातडीने उपाय करण्याची गरज प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे.