राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 22, 2020 01:43 PM2020-09-22T13:43:50+5:302020-09-22T13:45:40+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एनसीपी नेत्या सुप्रिया सुळे यांनाही आयकर विभाग नोटीस धाडण्याची शक्यता आहे.

Income tax notice to NCP lewder sharad pawar  shiv sena leader Uddhav Thackeray about election affidavit | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह

Next


मुंबई - संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जबरदस्त खडाजंगी सुरू असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ही नोटीस, गेल्या निवडणुकांत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात आहे. 

याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एनसीपी नेत्या सुप्रिया सुळे यांनाही आयकर विभाग नोटीस धाडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंगळवारी शरद पवार यांना विचारले असता, 'आपल्यावर प्रेम असल्याने आनंद आहे. पहिल्यांदाच मला नोटीस आली, सुप्रिया यांना येणार असल्याचे समजते. चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा आनंद आहे', असे पवार म्हणाले.

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

'मला सोमवारी नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून ही नोटीस आली आहे. त्याचे उत्तर आपण लवकरच देऊ. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात ही नोटीस आहे,' असेही शरद पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या भाजपा आणि राज्य सरकार यांच्यात तणावाचे वातावरण आहे. अशातच आयकर विभागाचे नोटीस प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाकडून या नोटिशीत निवडणूक काळात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची माहिती मागवली आहे.

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

पवारांचा उपवास -
संसदेत नुकतीच कृषी विधेयके मंजूर झाली. या विधेयकांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत आहे. आजच यासंदर्भात शरद पवारांनी एक दिवसाचा उपवास ठेवणार असल्याचे म्हटले होते, अशातच या नोटिशीचे  वृत्त आले आहे.

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

Read in English

Web Title: Income tax notice to NCP lewder sharad pawar  shiv sena leader Uddhav Thackeray about election affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.