शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 06:20 IST

प्रकल्पांबाबत पुनरावृत्ती, कालापव्यय टाळण्यासाठी सरकारचा निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा मंत्री समितीला २५ कोटी रुपये वा त्यापेक्षा अधिकच्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा अधिकार असेल.

मुंबई - राज्यात हजारो कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे होऊ घातली असताना  त्यांच्या मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची गरज नसेल. राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा मंत्री उपसमितीला समितीचा दर्जा देण्यात आला असून ही समितीच अंतिम मान्यतेबाबत निर्णय घेईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे समितीचे सदस्य मंत्री आहेत. या शिवाय ज्या विभागाचा पायाभूत सुविधा प्रकल्पाचा प्रस्ताव आहे त्या विभागाच्या मंत्री हे त्या-त्यावेळी निमंत्रित सदस्य असतील. 

आधीही अशीच व्यवस्था होती. मात्र, फडणवीस सरकारनेच १० जुलै २०२५ रोजी एक आदेश काढून ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता अनिवार्य केली होती. मात्र,  हा शासन निर्णय रद्द केला आहे.  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा मंत्री समितीला २५ कोटी रुपये वा त्यापेक्षा अधिकच्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा अधिकार असेल. समितीसमोर विभागाचा प्रस्ताव मान्यतेसाठी येताना तो नियोजन विभागामार्फतच समितीसमोर यायला हवा हे बंधनकारकक असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे वित्त व नियोजन मंत्रीदेखील आहेत. त्यामुळे एकप्रकारे मंत्रिमंडळ समितीसमोर कोणते प्रस्ताव आणायचे याचा निर्णय अजित पवार करणार आहेत. त्यांच्या विभागाने मान्यता दिलेला प्रस्ताव हा पायाभूत सुविधा समितीसमोर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल.

हा निर्णय का घेतला?आधी पायाभूत सुविधा उपसमितीने प्रकल्पाला मंजुरी द्यायची मग मंत्रिमंडळाचीही मंजुरी घ्यायची यात कालापव्यय होत असून मान्यतेची पुनरावृत्तीही होते हे लक्षात आल्यानंतर आता उपसमितीला समितीचा दर्जा देऊन या समितीने घेतलेला निर्णय हा मंत्रिमंडळाचाच निर्णय असल्याचे मानले जाणार आहे. राज्याचे मुख्य सचिव हे या समितीचे सचिव असतील.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस