बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 12:19 IST2022-06-16T12:17:59+5:302022-06-16T12:19:13+5:30

Gautam Adani In Baramati: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हे आज बारामतीमध्ये एकाच मंचावर आले आहे. बारामतीमध्ये सायन्स सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गौतम अदानी आज बारामतीमध्ये आले आहेत.

In Baramati, Sharad Pawar, Gautam Adani on the same stage, Rohit Pawar drove the car | बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य

बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य

बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हे आज बारामतीमध्ये एकाच मंचावर आले आहे. बारामतीमध्ये सायन्स सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गौतम अदानी आज बारामतीमध्ये आले आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हेसुद्धा उपस्थित आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा गौतम अदानींना उद्योग क्षेत्रात झुकतं माप देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून होत असतो, त्या पार्श्वभूमीवर आज अदानी पाहुणे म्हणून बारामतीमध्ये आल्याने अनेकांना आश्चर्चाया धक्का बसला आहे.

राजीव गांधी सायन्स आणि टेक्नॉलॉजी कमिशन, टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने आज बारामतीमध्ये बारामती सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचा उद्घाटन होत आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि गौतम अदानी एकत्र आले आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हेसुद्धा उपस्थित आहेत.

दरम्यान, गौतम अदानींच्या स्वागताची जबाबदारी रोहित पवार यांनी पार पाडली. गौतम अदानींचं स्वागत केल्यानंतर रोहित पवार यांनी स्वत: गाडी चालवत अदानी यांना कार्यक्रमस्थळी नेले.  

Web Title: In Baramati, Sharad Pawar, Gautam Adani on the same stage, Rohit Pawar drove the car