रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मार्चऐवजी आता एप्रिलपर्यंत विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:15 IST2025-03-29T12:15:03+5:302025-03-29T12:15:23+5:30
३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणारी बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष आता १ एप्रिलपासून सुधारित वेळेनुसार चालले.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मार्चऐवजी आता एप्रिलपर्यंत विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाड्या
Railway Time Table 2025 : मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष, जी २५ मार्चपर्यंत चालवण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दि. २९ एप्रिलपर्यंत धावणार आहे. अशाच प्रकारे लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी जी २६ मार्चपर्यंत चालण्यात येणार होती. ती गाडी आता ३० एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार आहे. तिरुपती-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी २८ मार्चपर्यंत ऐवजी २५ एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार आहे. सोबत सोलापूर-तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी २७ मार्चपर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दि. २४ एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणारी बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष आता १ एप्रिलपासून सुधारित वेळेनुसार चालले.
विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग करता येणार आहे. यासाठी रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर हे संपूर्ण देशाला रेल्वेने जोडणारे स्थानक असून येथून उत्तर भारत, दक्षिण भारतात जाण्याची सोय आहे. त्यामुळे येथून अनेकजण दूरच्या प्रवासाला जातात. त्यांच्यासाठी रेल्वेने केलेली ही सोय पर्वणी ठरत आहे. आता कालावधी वाढवल्यामुळे आखणी संधी मिळणार आहे.
या गाड्यांत नाही बदल
सोलापूर-दौंड, दौंड-सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष, सोलापूर-कलबुर्गी, कलबुर्गी-सोलापूर अनारक्षित दैनंदिन विशेष, नाशिक रोड-बडनेरा, कोल्हापूर-पुणे, पुणे-कोल्हापूर दैनंदिन विशेष, पुणे-हरंगुल, हरंगुल-पुणे दैनंदिन विशेष या गाड्याच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.