शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कल्पनाशील व्यक्तीच कलावंत असते

By admin | Updated: January 14, 2015 00:45 IST

कलावंत म्हटला की एक गोष्ट प्रामुख्याने येते ती म्हणजे त्याची कल्पकता. कल्पकता असल्याशिवाय ती व्यक्ती कलावंत होऊ शकत नाही. ज्ञान फार मर्यादित आहे, म्हणूनच कल्पनाशील व्यक्तीच कलावंत असते,

प्रमोदबाबू रामटेके : श्लोक चित्रप्रदर्शनाचा समारोप नागपूर : कलावंत म्हटला की एक गोष्ट प्रामुख्याने येते ती म्हणजे त्याची कल्पकता. कल्पकता असल्याशिवाय ती व्यक्ती कलावंत होऊ शकत नाही. ज्ञान फार मर्यादित आहे, म्हणूनच कल्पनाशील व्यक्तीच कलावंत असते, असे मत ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके यांनी येथे व्यक्त केले.प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्लोक’ चित्रप्रदर्शन सुरू करण्यात आले. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित या चित्रप्रदर्शनाचा आज मंगळवारी समारोप झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी प्रदर्शनातील सहा उत्कृष्ट कलाकृतीला रामटेके यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रामटेके म्हणाले, कलाकृतीच्या निकषाला घेऊन अनेकदा गोंधळ उडालेला असतो. कलाकृतीमध्ये काय असावे, काय नसावे याचा उहापोह प्राचीन ग्रंथात केला आहे. कलावंतांनी कलाकृती करताना त्याचे निरीक्षण करायला हवे आणि नंतर स्वत:च्या कल्पनेतून ते साकारायला हवे. जेव्हा एखादी कलाकृती मनात ठसते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने उतरते. कलेचे गुणधर्म पूर्णपणे एखाद्या चित्रात उतरले आहे का, याचे निकष ठेवूनच पुरस्कार दिला जातो. चित्रातील एका घटकाचे इतर घटकांशी संबंध आल्यानंतर निर्माण झालेले सौंदर्यच सर्वांचे लक्ष वेधून घेते, असेही ते म्हणाले. ‘श्लोक’ प्रदर्शनाची संकल्पना शीतल ऋषी दर्डा यांची आहे. या प्रदर्शनासाठी विदर्भातील चित्रकार आणि शिल्पकार यांच्याकडून त्यांच्या कलाकृती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुंबई येथे एका तज्ज्ञ समितीने कलाकृतींची निवड केली. निवडण्यात आलेल्या कलाकृतींच्या या प्रदर्शनाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोट्रेट कलावंत वासुदेव कामत यांच्या हस्ते करण्यात आले होते. कुणाल आणि अभिषेक यांची उत्कृष्ट कलाकृतीप्रदर्शनातील कलाकृतींमध्ये विद्यार्थी आणि व्यावसायिक आर्टिस्ट असे दोन गट तयार करून पुरस्कार वितरित करण्यात आले. विद्यार्थी गटात प्रथम पुरस्कार कुणाल गुज्जनवार याने पटकाविला. द्वितीय पुरस्कार अमित गोन्नाडे तर तृतीय पुरस्कार आदित्य दापके याला मिळाला. यात विशेष पुरस्काराचे मानकरी जीवन पराते ठरले. व्यावसायिक आर्टिस्ट या गटात प्रथम पुरस्कार अभिषेक चौरसिया याने पटकाविला. द्वितीय पुरस्कार रोशनी इंगोले तर तृतीय पुरस्कार राहुल लकडे याला मिळाला. या गटातील विशेष पुरस्कार मनीष गुप्ता याला देण्यात आला. यावेळी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे मिलिंद लिंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.संचालन प्रा. सदानंद चौधरी यांनी केले.प्रदर्शनाच्या समारोपाला ज्येष्ठ चित्रकार गुणवंत देवघरे, रघुवीर देवगडे, रवींद्र शिंगणापूरकर यांच्यासह अनेक रसिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)