शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

'पोर्टेबल' सोनोग्राफी मशीनमुळे राज्यभर अवैध गर्भपाताचा धंदा जोरात; यंत्रणा करतेय काय?

By संतोष हिरेमठ | Updated: March 16, 2026 19:38 IST

मोबाईलप्रमाणे ऑनलाइन मिळतेय सोनोग्राफी मशीन! राज्यात अवैध गर्भलिंग निदानासाठी ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर; रॅकेटचा पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : सोनोग्राफी मशीनचा स्थिर वापर करण्यास परवानगी आहे. मात्र, राज्यात सर्रास पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा उद्योग सुरू आहे. शासनाने अशा मशीनच्या वापरावर स्पष्ट बंदी घातलेली असतानाही ऑनलाइन खरेदी करून, गुप्तपणे त्याचा वापर केल्याच्या घटना पुढे होत आहेत. त्यामुळे यंत्रणा काय करतेय, असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या रॅकेटकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान सुरु होते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्रामीण भागातील घर, गोठे किंवा वाहनांमध्येही अशा मशीनचा वापर होत असल्याचे तपासात आढळले आहे. काही प्रकरणांमध्ये वायरलेस आणि ब्लूटूथ तंत्रज्ञानावर चालणाऱ्या सोनोग्राफी मशीनचा वापर करण्यात आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

८ दिवसांत घरीपोर्टेबल सोनोग्राफी मशीन, प्रोब अक्षरशः मोबाइल, स्मार्ट टीव्हीप्रमाणे ऑनलाइन बाजारात सहज मिळत आहेत. ऑर्डर दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांत डिलिव्हरी देण्याचे आश्वासनही ऑनलाइनवरील यंत्रणा देते.

ट्रॅकिंग सिस्टम हवीपोर्टेबल सोनोग्राफी मशीन यंत्रणा, प्रोब, सॉफ्टवेअर यासह महत्त्वाचे भाग ट्रॅक करता येतील, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मोबाइलप्रमाणे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ट्रॅकिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. मशीन कोण चालू केले, कुठे वापरले यावर लक्ष ठेवले पाहिजे.

पोर्टेबल वापरावर बंदी

अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणातील आरोपी सुटल्यावर पुन्हा तोच धंदा करीत असल्याचे समोर आले आहे. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन वापरण्यावर शासनाकडून बंदी आहे. राज्यासह देशभरात त्यावर बंदी आहे. हे मशीन कोणालाही मिळाली नाही पाहिजे. परंतु त्याची ऑनलाइन खरेदी केली जाते.- डाॅ. पारस मंडलेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा

वेळावेळी तपासणीपोर्टेबल सोनोग्राफी मशीनवर बंदी आहे. अवैध गर्भलिंगनिदान होऊ नये, यादृष्टीने आमच्याकडून नियमितपणे तपासणी केली जाते.- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक

पोर्टेबल सोनोग्राफी मशीन वापराची राज्यभरातील प्रकरणे- जून‎ २०२२ मध्ये बीड जिल्ह्यातील बक्करवाडी‎ येथे अवैध गर्भपात करताना ३० वर्षीय महिलेचा मृत्यू ‎झाला होता. त्या प्रकरणातही असेच पोर्टेबल मशीन वापरले होते‎.- मे २०२४ मध्ये छत्रपती संभाजी‎नगर शहरातील गारखेडा परिसरात ‎महापालिकेने छापा मारून अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड‎ केला होता. यातील आरोपींनी पाच लाख रुपयांत तीन सोनोग्राफी टॅब, प्रोब खरेदी केल्याचे उघडकीस आले होते.

- नोव्हेंबर २०२५ मध्ये भाेकरदन (जि. जालना) येथे सरकारी योजनेतून बांधलेल्या जनावरांच्या गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंगनिदान केंद्राचा स्थानिक गुन्हे शाखा, आरोग्य विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. यात अवैध गर्भलिंगनिदानासाठी प्रथमच ‎वायरलेस ब्लूटूथ सोनोग्राफी मशीनचा वापर ‎झाल्याचे समोर आले.- नोव्हेंबर २०२५ मध्ये नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासह आरोपी आढळून आले.

- ४ मार्च २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मोबाइल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड झाला.- १३ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये घरातच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारे रॅकेट उघड झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Portable Sonography Machines Fueling Illegal Abortions; Authorities Inaction?

Web Summary : Rampant use of portable sonography machines facilitates illegal sex determination and abortions across Maharashtra. Despite a ban, online availability enables misuse. Recent busts reveal networks operating in rural areas, even using wireless technology, raising concerns about enforcement and tracking of these devices.
टॅग्स :Medicalवैद्यकीयCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर