शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:28 IST

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात भाजपा नेते आक्रमक, देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा घेतला समाचार

मुंबई - मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यातच मंत्री नितेश राणे यांनी जरांगे पाटलांना गंभीर चेतावणी दिली आहे. आमच्या देवेंद्र फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढावी. मात्र ही लढाई लढताना आमच्या फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल, तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यासारख्या ९६ कुळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असं त्यांनी इशारा दिला. मनोज जरांगे यांनी बीडच्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. त्यानंतर भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मनोज जरांगे पाटील, हा माझा सल्ला किंवा इशारा समजा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठा आरक्षणाची गोष्ट करत आहात. त्या छत्रपतींनी आपल्याला आयाबहिणींची इज्जत कशी करावी, सन्मान कसा करावा हे शिकवले आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीने महिलांचा अपमान करत आहात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला, हे कदापि सहन करणार नाही. एवढीच जर तुम्हाला खाज असेल तर ज्या शरद  पवारांनी तुम्हाला एवढी वर्ष आरक्षण दिले नाही, त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही. यापुढे जर असे अपशब्द काढले तर तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर द्यायला कमी पडणार नाही असं आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं. 

दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. अनेक जिल्हे, तालुक्यात जाऊन मराठा समाजाच्या बैठका घेत आहेत. मराठा समाजाची ताकद मुंबईत दिसण्यासाठी आटापिटा करत आहेत. मुंबईकरांनी सांगावे, चूक सरकारची आहे का आमची? ५८ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत. आता सरकारला काय पुरावा पाहिजे. आता प्रश्न आहे, आम्ही तुमचे का ऐकावे? आम्ही मुंबईत का येऊ नये? यांना वेळ द्यायचा तरी किती? आम्ही प्रत्येक वेळी वेळ दिला आहे. काय व्हायचे ते होऊ द्या, मी मुंबईमध्ये घुसणार. आम्ही कोणाचे आरक्षण मागत नाही, आमचे आम्हाला आरक्षण द्यावे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNitesh Raneनीतेश राणे Prasad Ladप्रसाद लाडBJPभाजपा