‘जादा जागा आल्यास मुख्यमंत्री आमचाच’

By Admin | Updated: September 16, 2014 02:39 IST2014-09-16T02:39:33+5:302014-09-16T02:39:33+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसला जादा जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

'If we get extra space, our chief minister' | ‘जादा जागा आल्यास मुख्यमंत्री आमचाच’

‘जादा जागा आल्यास मुख्यमंत्री आमचाच’

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक निकालानंतर जर राष्ट्रवादी कॉँग्रेसला जादा जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. 
जागा वाटपाचा निर्णय घेताना 2क्क्9 चे निकष लावले जावेत, असे आमचे म्हणणो आहे. चर्चा सुरू आहे; परंतु कॉँग्रेसकडून योग्य तो प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. येत्या तीन-चार दिवसांत यावर तोडगा निघेल. काँग्रेस हा आमचा मोठा भाऊ असल्याने तो पुढाकाराची भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे, असे तटकरे म्हणाले. 
राष्ट्रवादीला जादा जागा मिळाल्या तर आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. 2क्क्4 ची पुनरावृत्ती होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री कोण होईल, हे पक्षाचे निवडून येणारे आमदार ठरवतील, असे तटकरे म्हणाले.  (प्रतिनिधी) 

 

Web Title: 'If we get extra space, our chief minister'