'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 18:14 IST2025-05-24T18:10:57+5:302025-05-24T18:14:06+5:30

Chhagan Bhujbal Dhananjay Munde: काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडेंना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांनी मुंडेंसाठी मंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 

'If Dhananjay Munde gets a clean chit, I will resign from the ministerial post', Chhagan Bhujbal's big statement as soon as he became a minister | 'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

Chhagan Bhujbal Dhananjay Munde Latest news: 'धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली, तर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन', असे विधान काही दिवसांपूर्वी मंत्रि‍पदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांनी केले आहे. काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो, असेही ते म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कॅबिनेट मंत्रीछगन भुजबळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजीनाम्याबद्दल विधान केले. 

भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले, तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. 

भुजबळ म्हणाले, मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन

या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, "उद्या जर धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली, तर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं, तर माझी काहीही हरकत नाही."

वाचा >>एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप

"मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय. मला सन्मानाने परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले. त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली, तर मी राजीनामा देईन", असे विधान छगन भुजबळ यांनी यावेळी केले. 

राजीनाम्याचा निर्णय मीच घेईन

मंत्रिपद देताना या गोष्टीची चर्चा झाली होती का? असा प्रश्नही छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. भुजबळ म्हणाले, "अशा पद्धतीची चर्चा होवो अथवा न होवो; राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार."

मंत्रिमंडळात डावलल्याने नाराज होते भुजबळ

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा भुजबळांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल, असे समजले जात होते. पण, त्यांना संधी दिली गेली नाही. नाशिकमधून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ मंत्री बनले होते. 

पक्षाकडून मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे याबद्दलची खदखद व्यक्तही केली होती. याच दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले. त्यात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आरोप झाले. आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यामुळे भुजबळांसाठी मंत्रिमंडळात संधी तयार झाली होती. 

Web Title: 'If Dhananjay Munde gets a clean chit, I will resign from the ministerial post', Chhagan Bhujbal's big statement as soon as he became a minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.