सावंतवाडीचा उमेदवार मीच ठरवणार - राणो

By Admin | Updated: September 16, 2014 02:40 IST2014-09-16T02:40:27+5:302014-09-16T02:40:27+5:30

सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडला असून तेथील उमेदवार मीच ठरविणार आहे. तसे अधिकार मला देऊन राष्ट्रवादीने मोठेपणा दाखवल्याचे उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सांगितले.

I will decide on Sawantwadi candidate - Rano | सावंतवाडीचा उमेदवार मीच ठरवणार - राणो

सावंतवाडीचा उमेदवार मीच ठरवणार - राणो

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडला असून तेथील उमेदवार मीच ठरविणार आहे. तसे अधिकार मला देऊन राष्ट्रवादीने मोठेपणा दाखवल्याचे उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सांगितले.
नारायण राणो यांनी सोमवारी सावंतवाडीच्या राजवाडय़ाला भेट देत राजमाता सत्वशीलादेवी भोसलेंचे आशीर्वाद घेतले. राज्यात दोन्ही आघाडय़ांत वाद सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर पंचरगी लढत होईल, असे तुम्हाला वाटते का, असे विचारले असता राणो यांनी स्पष्टपणो नाही असे सांगितले. आघाडीतील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटू शकेल, असेही ते म्हणाले. 
सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे जर आघाडीचे उमेदवार असतील, तर ते मला चालतील. मी त्यांना सर्व ती मदत करेन, असे राणो म्हणाले. (प्रतिनिधी)

 

Web Title: I will decide on Sawantwadi candidate - Rano