शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

मला ’बॉलिवूड’ने नव्हेतर मराठी चित्रपटसृष्टीने ’वाळीत’ टाकले होते : विक्रम गोखले यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 12:38 IST

मला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कुणी कधी  ‘घाटी’ म्हणून संबोधलं नाही किंवा मराठी म्हणून कुणीही गैरवागणूक दिली नाही..

ठळक मुद्देविक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आलेल्या स्वानुभवावर परखड केले भाष्य

नम्रता फडणीस -

पुणे :  मला  ‘बॉलिवूड’ मध्ये कधीही नेपोटिझमचा त्रास झाला नाही, ना कुणी वाईट वागणूक दिली. पण सुरूवातीच्या काळात मराठी चित्रपटसष्टीमध्ये खूप त्रास भोगावा लागला. पंधरा वर्षे मला  ‘वाळीत’ टाकण्यात आले होते....असा गौप्यस्फोट करीत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटसृष्टीलाच घरचा आहेर दिला आहे.      

      कंगनाच्या ’’मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटते’ या वादग्रस्त विधानावर तिच्यात आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. कंगनाच्या या विधानावर अनेक मराठी कलाकारांनी देखील तिला सोशल मीडियावर खडे बोल सुनावले. या वादात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने देखील उडी घेतली आहे. कंगनाला प्रत्युत्तर देण्याबरोबरच मराठी कलाकार म्हणून मला बॉलिवूडमध्ये  ‘घाटी’ म्हणून संबोधले जायचे असे खळबळजनक विधान तिने केले आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमध्ये मध्ये यशस्वी मराठी कलाकारांना दिल्या जाणा-या वागणुकीबददल काही कलाकारांशी ' लोकमत'ने  संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ’आम्हाला  या वादात पडायचे नाही नि कृपया ओढूही नका’ असे सांगून काही कलाकारांनी मौन बाळगले. मात्र विक्रम गोखले यांनी याविषयावर रोखठोकपणे भाष्य करीत मराठी चित्रपटसृष्टीवरच ताशेरे ओढले आहेत.         

मला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कुणी कधी  ‘घाटी’ म्हणून संबोधलं नाही किंवा मराठी म्हणून कुणीही गैरवागणूक दिली  नाही. मी  हिंदीमध्ये तडजोड म्हणून कधीही कुठलीही कामं केली नाहीत. मला काम नाही मिळालं तरी हरकत नाही, मी घरी राहीन हे माझे आचरण आणि विचार होते. या अविर्भावामुळे मराठी चित्रपट क्षेत्राने मला वाळीत टाकले होते. पंधरा वर्ष मी मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर होतो. चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी निर्माते चित्रपटांसंदर्भात कलाकारांबरोबर तोंडी चर्चा करीत असतं. लिखित स्वरूपात काही दिले जात नसे. त्यामुळे पैसे बुडत असतं .  काही बोलता देखील यायचे नाही. जे बोलतील त्यांना बाहेर फेकले जायचे. त्यावेळी मी स्वत:च्या अटी मुद्रित स्वरूपात छापल्या होत्या आणि त्यावर निर्मात्यांची सही घेत होतो. पण निर्मातेनंतर कळवतो म्हणून कधीच कळवत नसतं. मग बाहेर जाऊन माझ्याविषयी उलटसुलट चर्चा करीत असत अशा शब्दांत विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आलेल्या स्वानुभवावर परखड भाष्य केले. 

...................देशात मतप्रदर्शन करण्याचा अधिकार प्रत्येकाला..  मुळात कंगना राणावत हिने असा काय गुन्हा केलाय? सुशांत केसमागे ती फक्त ठामपणे उभी राहिली . तिलाही ‘नेपोटिझम’चा सामना करावा लागला एवढंच ती सांगत होती. मुळातच हे ओपन सिक्रेट आहे की बॉलिवूडमध्ये कित्येक जण नशेच्या आहारी गेलेले आहेत. कोण कशाला घाबरत आहे तेच कळत नाही. मुंबई पालिकेने तिच्या घरात घुसून अतिक्रमण तोडले. पण मुंबईमध्ये अशी कितीतरी अनाधिकृत बांधकामे आहेत मग त्यांचे काय? याकडे विक्रम गोखले यांनी लक्ष वेधले.  या देशात प्रत्येकाला आपले मतप्रदर्शन करायचा अधिकार आहे, ते योग्य की अयोग्य हा नंतरचा मुददा आहे. पण तिने मुख्यमंत्री यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला, जो अत्यंत चुकीचा होता. त्यांच्या पदाचा तरी सन्मान राखलाच जायला हवा, असेही ते म्हणाले. ----------------------------------------- 

 चित्रपटसृष्टी असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो त्यात राजकारण आहेचं. या क्षेत्राला ग्लँमर आहे त्यामुळे प्रत्येकाकडे टँलेंट असेलचं असे नाही. एकतर आपल क्षेत्र नक्की कोणतं आहे ते ठरवावं. राजकारणात जायचंय मग या क्षेत्रात या असं झालंय. पैशासाठी वाट्टेल ते केले जाते. ‘‘बॉलिवूड’ ही एक मानसिकता बनली आहे. ग्लँमर, पैसा आणि क्षेत्र असे एक समीकरण झाले आहे. जगणं आणि त्याप्रमाणं इच्छित हालचाली घडवून आणण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

टॅग्स :PuneपुणेVikram Gokhaleविक्रम गोखलेcinemaसिनेमाbollywoodबॉलिवूडKangana Ranautकंगना राणौतShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकार