शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

By admin | Updated: June 29, 2016 20:35 IST

लग्नाला सहा वर्षे उलटूनही मुल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९  : लग्नाला सहा वर्षे उलटूनही मुल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली. सुरेश बीजे (४०) आणि प्रीती सुरेश बीजे (३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

पवई येथील साई बागुरडा गावात बीजे दाम्पत्य राहायचे. त्यांचा प्रेमविवाह आहे. लग्नाला सहा वर्ष उलटूनही मुल होत नसल्याने दोघांमध्ये खटके उडायचे. याबाबत प्रीतीवर उपचारही सुरु होते. गेल्या वर्षभरापासून सुरेशलाही डोकेदुखीचा त्रास सुरु झाल्याने त्याने नोकरी सोडली. त्यानंतर तो घरीच राहायला लागला. घरीच राहत असल्याने तो तिला मारझोड करी. तिने बहीण मिनाकडे वेळोवेळी याबाबत सांगितले होते. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रीती घरी आली. रात्री आठच्या सुमारास भाजी नेण्यासाठी आलेल्या चुलत बहीणीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.

नातेवाईकांनी तेथे धाव घेत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तेथील खिडकीच्या काचेतून सुरेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तत्काळ घराचे छप्पर तोडून सुरेशच्या भावाने घरात प्रवेश केला. आतून कडी उघडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रीती आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरेशला पाहून कुटुंबियांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती त्यांना रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल न होण्यावरुन मंगळवारी दोघांमध्ये भांडण झाल्याचा संशय आहे. याच रागात सुरेशने हातोड्याने पत्नीच्या डोक्यावर घाव केले. त्यानंतर तिच्या हाताची नस कापून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. प्रीतीच्या डोक्यावर हाताड्याने तब्बल पाच घाव करण्यात आले आहे. याप्रकरणी सुरेशविरोधात हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी कुठल्याही स्वरुपाची सुसाईट नोट पोलिसांना सापडलेली नाही. मात्र तेथील एका लाईट बिलावर झगडा असे नमूद करण्यात आले आहे. त्या शेजारीच पेन पडलेला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुरेशने हे लिहिले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुसाईट नोटवरील हस्ताक्षर नेमके कुणाचे याचा तपास सुरु असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.