शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा चावा घेणारी पत्नी गजाआड...

By admin | Updated: April 8, 2015 02:37 IST

पत्नी रूढी-परंपरा न जुमानणारी, स्वच्छंदी आणि पाश्चिमात्य संस्कार अंगीकारलेली, तर पती पूजापाठ, होम-हवनात रममाण होणारा़ प्रेमविवाहानंतर लगेचच दोघांच्या या परस्परविरोधी सवयी समोर आल्या आणि घरात

मनीषा म्हात्रे, मुंबईपत्नी रूढी-परंपरा न जुमानणारी, स्वच्छंदी आणि पाश्चिमात्य संस्कार अंगीकारलेली, तर पती पूजापाठ, होम-हवनात रममाण होणारा़ प्रेमविवाहानंतर लगेचच दोघांच्या या परस्परविरोधी सवयी समोर आल्या आणि घरात द्वंद्व सुरू झाले. काही वर्षे सातत्याने सुरू असलेली बाचाबाची, रुसवे-फुगवे, अबोल्याने हिंसक रूप घेतले. पत्नीने रागाच्या भरात पतीचा करकचून चावा घेतला. पतीने त्याच अवस्थेत मुलुंड पोलीस ठाणे गाठले. या घटनेच्या पाच महिन्यांनंतर मुलुंड पोलिसांनी पत्नी पौर्णिमा मेपाणी (४१) हिला गजाआड करण्यात आले.गेल्या वर्षी १ नोव्हेंबरला ही घटना मुलुंडच्या वालजी लद्दा रोडवरील उच्चभ्रू सोसायटीत घटना घडली. नयन नेपाणी (४२) असे या प्रकरणातील तक्रारदार पतीचे नाव असून, ते उद्योगपती आहेत. व्यवसायानिमित्त कर्नाटक दौऱ्यावर असताना त्यांची ओळख पौर्णिमाशी झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाह केला. सुरुवातीची काही वर्षे सुरळीत गेली. मात्र हळूहळू दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी, तत्त्वे खटकू लागली. दरम्यान, अपत्यप्राप्तीमुळे तडजोड करून दोघे सोबत राहू लागले. १ नाव्हेंबरला रात्री उशिरा घरी परतलेल्या नयनने यावरून पौर्णिमाशी वाद घातला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि अखेरीस पौर्णिमाने नयनच्या दंडाचा करकचून चावा घेतला. या घटनेनंतर मात्र नयनने पोलीस ठाणे गाठून पौर्णिमाची तक्रार दिली. पोलिसांनी नयनला अग्रवाल रुग्णालयात दाखल करीत पौर्णिमाविरोधात गुन्हा नोंदविला. घरगुती कलह असल्याने पोलिसांनी पौर्णिमाला नोटिसा धाडून चौकशीस हजर राहण्यास अनेकदा बजावले. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही सबब पुढे करून ती टाळू लागली. अखेर मंगळवारी ती हजर झाली. जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आले.