शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

डाळींच्या दरात प्रचंड दरवाढ ! तूरडाळीने तर बजेट कोलमडेल; किलोमागे किती रुपयांची झाली वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:19 IST

Chandrapur : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या ताटातील वरण आता महागले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत असतानाच, आता डाळींच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या ताटातील वरण आता महागले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत असतानाच, आता डाळींच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. विशेषतः तूरडाळीच्या किमतीत प्रतिकिलो २० ते ३० रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

काही दिवसांपूर्वी ८० ते १०० रुपयांच्या दरम्यान मिळणारी तूरडाळ आता थेट १३० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. केवळ तूरच नव्हे, तर मूग, उडीद आणि मसूर डाळीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आवक कमी होणे आणि मागणी वाढणे, यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांना आता डाळीचा वापर जपून करावा लागत आहे.

असे आहेत डाळींचे दर (प्रतिकिलो)

डाळीचा प्रकार सहाः स्थितीतील दर (रुपये)
तूरडाळ                       १२० - १३०
मूगडाळ                       ११० - १२०
उडीद डाळ                  १२० - १३०
मसूर डाळ                    ९० - १००
हरभरा डाळ                  ८० - २०


सर्वसामान्यांचे ताट रिकामे ?

डाळ हा प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. मात्र, डाळींचे भाव वाढल्याने मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या ताटातून वरण गायब होण्याची भीती निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळात ही दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पालेभाज्यांपाठोपाठ आता डाळींचाही मार

आधीच अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचे भाव वधारलेले असताना, आता डाळींनीही जोर धरला आहे. किराणा दुकानात गेलेला ग्राहक डाळींचे भाव ऐकून अर्ध्या किलोवरच समाधान मानत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

"अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे बाजारात मालाची टंचाई निर्माण झाली. नवीन माल बाजारात येण्यास अद्याप उशीर असल्याने साठवणूक केलेला माल संपत आला आहे, ज्यामुळे किमती वाढत आहेत."
- सुरेश वर्मा, व्यापारी, चंद्रपूर

"दर महिना किराणा सामानाचे बिल वाढतच चालले आहे. तूर डाळीचे भाव किलोमागे ३० रुपयांनी वाढल्याने दररोजच्या जेवनात वरण कसे बनावायचे असा प्रश्न आहे. सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे."
- संजना राऊत, गृहिणी

English
हिंदी सारांश
Web Title : Dal Prices Soar: Tur Dal Hikes Upset Household Budgets

Web Summary : Prices of pulses, especially tur dal, have surged, increasing ₹20-30 per kg. Reduced supply and high demand are blamed. Families struggle as dal, a protein source, becomes unaffordable, impacting daily meals and budgets amid rising grocery costs.
टॅग्स :InflationमहागाईMaharashtraमहाराष्ट्र