राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज (बुधवार) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण ६ जणांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभांसाठी ते सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असतानाच हा अपघात झाला आणि ते एका शेतात कोसळले.
विमान अपघातात सर्वांचाच मृत्यू - डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सर्वांचाच मृत्यू झाला आहे. अपघातावेळी ‘लीयरजेट ४५’ विमानात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि सहकारी विदीप जाधव, पिंकी माळी, तसेच पायलट कॅप्टन सुमित कुपूर, कॅप्टन शांभवी पाठ हे बसलेले होते.
अशी झाली राजकीय जीवनाची सुरुवात -अजित पवार यांनी 1989 मध्ये आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हा ते को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रीच्या बोर्डावर निवडून गेले होते. यानंतर, १९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. अजित पवार १९९१ साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते.
१९९१ ते १९९५ या काळात ते विधानसभा सदस्य होते. अजित पवार नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत. १९९९ ते २००४ या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९५ पासून २०१९ पर्यंत सलग ७ वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली होती.
मात्र यानंतर, अंतर्गत कलहामुळे, ते शरद पवारांपासून वेगळे झाले. पक्षाचे दोन गट झाले. यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले आणि सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. फेब्रुवारी २०२४ मध्ये, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) त्यांना पक्षाचे अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली.
Web Summary : Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. He possessed assets worth ₹124.55 crore. Pawar started his political journey in 1989 and served multiple terms as Deputy Chief Minister. Internal disputes led him to join the BJP-led government.
Web Summary : बारामती के पास एक विमान दुर्घटना में अजित पवार का दुखद निधन हो गया। उनके पास ₹124.55 करोड़ की संपत्ति थी। पवार ने 1989 में अपनी राजनीतिक यात्रा शुरू की और कई बार उप-मुख्यमंत्री के रूप में कार्य किया। आंतरिक विवादों के कारण उन्होंने भाजपा के नेतृत्व वाली सरकार में शामिल हो गए।