अजितदादांचा अपघात नेमका कसा झाला? उद्या एएआयबीचा अहवाल, रोहित पवारांकडेही धक्कादायक पुरावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:54 IST2026-02-27T11:51:35+5:302026-02-27T11:54:08+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार ...

How exactly did Ajit's accident happen? AAIB report tomorrow, Rohit Pawar also has shocking evidence! | अजितदादांचा अपघात नेमका कसा झाला? उद्या एएआयबीचा अहवाल, रोहित पवारांकडेही धक्कादायक पुरावे!

अजितदादांचा अपघात नेमका कसा झाला? उद्या एएआयबीचा अहवाल, रोहित पवारांकडेही धक्कादायक पुरावे!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकार आणि चौकशी समितीवर निशाणा साधला आहे.  तसेच येत्या सोमवारी आम्ही पत्रकार परिषदेत धक्कादायक पुरावे मांडणार आहोत,"असा इशारा देत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताचा एएआयबीचा प्राथमिक अहवाल उद्या येणे अपेक्षित आहे. या अहवालातून अपघाताचे नेमके कारण आणि सत्य परिस्थिती समोर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

रोहित पवार म्हणाले की, "अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या एएआयबीचा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत, त्यामुळे भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातूर अहवाल देण्याचा प्रयत्न एएआयबी नक्कीच करणार नाही, ही अपेक्षा!"

Web Title : अजित पवार का हादसा: एएआईबी रिपोर्ट कल, रोहित पवार के पास चौंकाने वाले सबूत!

Web Summary : अजित पवार के हेलिकॉप्टर हादसे के एक महीने बाद, रोहित पवार ने प्रेस कॉन्फ्रेंस में चौंकाने वाले सबूतों का खुलासा करने का संकेत दिया। एएआईबी की रिपोर्ट कल आने की उम्मीद है, उम्मीद है कि घटना के पीछे की सच्चाई सामने आएगी। सबकी निगाहें रिपोर्ट और रोहित पवार के आगामी खुलासे पर हैं।

Web Title : Ajit Pawar's Accident: AAIB Report Tomorrow, Shocking Evidence with Rohit Pawar!

Web Summary : A month after Ajit Pawar's helicopter accident, Rohit Pawar hints at revealing shocking evidence in a press conference. The AAIB report is expected tomorrow, hopefully revealing the truth behind the incident. All eyes are on the report and Rohit Pawar's upcoming revelations.