शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray यांना मुख्यमंत्रिपद कसं मिळालं? काय घडलं त्या रात्री, Narayan Rane यांचा मोठा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 10:53 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा करावी, अशी विनंती Uddhav Thackeray यांनी Sharad Pawar यांना केली होती, असा दावा Narayan Rane यांनी केला आहे.

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात जुगलबंदी रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपावर घणाघाती टीका केल्यानंतर आता नारायण राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. तसेच शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्रिपदी कसे बसले, याबाबतही राणेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. तर मीच त्यांचा हात उंचावून ते मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली होती, असा दावा शरद पवार यांनी केला होता. दरम्यान, नारायण राणे यांनी याबाबत वेगळाच दावा केला आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा करावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना केली होती, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे सांगतात मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. कसे केले हे आम्हाला माहिती आहे. शिवसैनिक त्याचे साक्षीदार आहेत. संजय राऊत जी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना घेऊन शरद पवार साहेबांच्या घरी पोहोचलात. त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कुणी शिवसैनिक नव्हता. तुम्ही तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, ‘साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहोत.’ याला राऊत यांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो.’ त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले.

यावेळी बाळासाहेबांसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या संबंधांवरूनही नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी काय काय थापा मारल्या. साहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलं म्हणून सांगतात. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, हा शब्द तुम्ही साहेबांना दिला. पण स्वत:च मुख्यमंत्री झालात. यापुढे ते शक्यच नाही. पण, भविष्यात चुकून संधी मिळाली, तर हे ठाकरे सोडून कोणालाच मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. साहेबांनी घातलेली शपथ मोडून दोनदा घर सोडून हॉटेल हॉलिडे इनमध्ये राहायला गेलेले साहेबांचा शब्द काय पाळणार? शिवसैनिकांना कदाचित ही बनवाबनवी समजणार नाही. पण माझ्यासारखे अनेक लोक या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यावेळी मी मध्यस्थी केली नसती, तर आता आपण कुठे असता? साहेबांच्या हयातीत जे पुत्रकर्तव्यास जागले नाहीत, ते साहेब गेल्यानंतर कसे काय पुत्रकर्तव्यास जागणार संजय राऊतजी? असा सवालही नारायण राणे यांनी विचारला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार