"अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?", अमोल मिटकरींची अपघाताबद्दल नवी शंका काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:52 IST2026-02-17T15:51:15+5:302026-02-17T15:52:18+5:30
अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे आगीमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर आमदार रोहित पवारांपाठोपाठ आमदार अमोल मिटकरींनीही शंका उपस्थित केल्या आहेत.

"अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?", अमोल मिटकरींची अपघाताबद्दल नवी शंका काय?
बारामतीत अपघात झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल आता शंकांचे काहूर माजले आहे. या ब्लॅक बॉक्सचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता आमदार अमोल मिटकरींनी प्रश्न केले आहेत.
आमदार अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट करत विमान अपघाताचा फोटो शेअर केला आहे. "विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो."
मिटकरी काय म्हणाले आहेत?
"अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉस असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?", असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.
विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाचीटेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झाला त्या… pic.twitter.com/RelNneoBxd
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 17, 2026
ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवार काय म्हणाले आहेत?
रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना याबद्दल शंका उपस्थित केल्या. " विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे. पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही. आता याच्यामध्ये काय राजकारण चाललं आहे, हे आपल्याला बघावं लागेल", असे रोहित पवार म्हणाले.
"उद्या अधिक खोलात जाऊन या घटनेवेळी काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आहेत, त्या आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत", असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.