शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

अफजलखान म्हणणाऱ्यांच्या पुढे नतमस्तक कसे झाले? धनंजय मुंडे यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 7:36 PM

मुख्यमंत्री शिवसेनेला म्हणतात वाघाच्या जबड्यात मोजतो दात , त्यांनी जबड्यात हात घातला पण दातच नव्हते.

ठळक मुद्देसंपत्ती कशी झाली याचा जबाब द्यावामोदी हे नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा, स्कील, स्टार्ट अप विषयी का बोलत नाहीत ?

तळेगाव ढमढेरे : भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे अफजलखान आहेत , त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवले तर त्यांचा कोथळा बाहेर काढू अशी टीका करणारे उद्धव ठाकरे ईडीची चौकशी होऊ नये म्हणून ते कमळाबाई समोर नतमस्तक झाले आहेत. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुजरातला गेले , उद्धव ठाकरे हे साधे ग्रामपंचायत सदस्य , जिल्हा परिषद सदस्य , किंवा आमदार , खासदारही नाहीत. तरीही  त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली याचा जाब ठाकरे यांनी द्यावा, असे जाहीर आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तळेगाव ढमढेरे येथे आयोजित जाहीर सभेत केले .     शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारा निमित्त तळेगाव ढमढेरे येथील प्रचार सभेत मुंडे हे बोलत होते.  मुंडे  म्हणाले , ‘‘साडेचार वर्ष उद्धव ठाकरेंनी भाजपाला इतक्या लाथा मारल्या कि गिनिज बुकवाले रेकॉर्ड घेण्यासाठी येतील. लाथा मारल्याने ठाकरे यांचे पाय लांब झाले आहे. शहांना उद्देशून ठाकरे म्हणाले होते कि अफजल खान चालुन येणार. मी  त्यांचा कोथळा बाहेर काढणार पण प्रत्यक्षात मात्र स्वत: ठाकरे अफझल खानाच्या शमियानात मुजरा करायला गेले. का तर  ‘ईडी’ची पिडा टळो दे म्हणून.   मुख्यमंत्री शिवसेनेला म्हणतात वाघाच्या जबड्यात मोजतो दात , त्यांनी जबड्यात हात घातला पण दातच नव्हते.   मोदी हे नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा, स्कील, स्टार्ट अप विषयी का बोलत नाहीत ? कारण मोदी हे एक नंबर फेकू आहेत. औसा येथे शहिदांच्या नावाने मत मागता , यापूर्वी अटलजींनी कारगिलच्या नावाखाली शहिदांच्या नावाने कधी मत मागितलं नाही . नोटबंदीतील नुकसान , मोठी मंदी आली , पुलवामा झाला या सर्वांची जबाबदारी मोदींनी घ्यावी. खासदार आढळराव यांना डॉ. कोल्हे यांची जात दिसली .  कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रती इमानदार आहेत. पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज कळावे यासाठी स्वत:चे सर्वस्व पणाला लावून त्यांनी बाबाजी ढमढेरे यांचा इतिहास समाजासमोर आणला, असे मुंडे यांनी सांगितले.  यावेळी प्रदीप गारटकर, प्रदीप कंद,सुजाता पवार, माजी आमदार दिलीप ढमढेरे, पोपटराव गावडे,  काकासाहेब पलांडे, निवृत्ती अण्णा गवारे, मंगलदास बांदल, बाळासाहेब ढमढेरे, बाळासाहेब नरके, कुसुम मांढरे. सरपंच सोनवणे, शंकर भूमकर, वर्षा शिवले, मानसिंग पाचुंदकर,शेखर पाचुंदकर, प्रकाश पवार, स्वाती पाचुंदकर ,सविता बगाटे, केशर पवार, महेश ढमढेरे, वैभव,विजय ढमढेरे,विश्वास ढमढेरे,वैभव यादव,अनिल भुजबळ,रवी काळे,जयमाला जकाते,मोनिका हारगुडे,विद्या भुजबळ,संगीता शेवाळे आदि उपस्थित होते .

टॅग्स :Shirurशिरुरshirur-pcशिरूरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDhananjay Mundeधनंजय मुंडे