शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी रुग्णालये सज्ज

By admin | Updated: August 18, 2014 04:03 IST

दहीकाला उत्सवासाठी गोविंदा पथकांची जोमाने तयारी सुरू आहे. त्याचबरोबरीने दुर्घटनांसाठी शहरातील महापालिका आणि सरकारी रुग्णालयेही सज्ज झाली आहेत.

मुंबई : दहीकाला उत्सवासाठी गोविंदा पथकांची जोमाने तयारी सुरू आहे. त्याचबरोबरीने दुर्घटनांसाठी शहरातील महापालिका आणि सरकारी रुग्णालयेही सज्ज झाली आहेत. मुंबईतील पालिकेची तीन प्रमुख रुग्णालये आणि जेजेमध्ये मिळून ७० खाटा गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दहीहंडीचा सराव करताना यंदा जखमी झालेल्या गोविंदांची संख्या ७ वर गेली आहे. या सातही गोविंदांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वेळी एक थर कमी लावा, पण अपघात टाळा, असे दहीहंडी समन्वय समितीने सांगितले आहे. तरीही इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे रुग्णालयांनी पूर्ण तयारी ठेवली आहे. केईएम रुग्णालयामध्ये १५ ते २० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, एक २५ डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. आॅर्थोपेडिक्स, सर्जरी विभागातील ८ डॉक्टर आणि इतर डॉक्टरांचा या टीममध्ये समावेश असेल. याच बरोबरीने सुरक्षेच्या दृष्टीनेही आपत्कालीन विभागामध्ये सुरक्षारक्षक तैनात केले आहेत, अशी माहिती केईएमच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली. नायर रुग्णालयामध्ये १५ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सायन रुग्णालयामध्ये एक वॉर्ड तयार करण्यात आला असून, त्यामध्ये २० खाटा राखीव ठेवल्या आहेत, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. जेजे रुग्णालयामध्ये २० खाटा गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असे जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. पालिका रुग्णालयांमध्ये गोविंदांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)