होमी भाभांच्या बंगल्याचा ३७५ कोटींना लिलाव

By Admin | Updated: June 18, 2014 18:53 IST2014-06-18T15:44:17+5:302014-06-18T18:53:56+5:30

भारतातील अणूउर्जेचे जनक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मलबार हिल येथील बंगल्याचा ३७५ कोटी रुपयांमध्ये लिलाव झाला आहे.

Homi Bhabha's bungalow fetches Rs 375 crore | होमी भाभांच्या बंगल्याचा ३७५ कोटींना लिलाव

होमी भाभांच्या बंगल्याचा ३७५ कोटींना लिलाव

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १८-  भारतातील अणूउर्जेचे जनक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मलबार हिल येथील बंगल्याचा अखेर लिलाव झाला आहे. १५ हजार स्क्वेअर फुटाच्या विस्तीर्ण जागेवर वसलेल्या या बंगल्यासाठी ३७५ कोटी रुपयांची बोली लागली असून बंगला कोणी विकत घेतला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अणूउर्जा क्षेत्रात संशोधन करत असताना होमी भाभा यांनी मुंबईतील मलबार हिल येथील बंगल्यात वास्तव्य केले होते. १९६६ मध्ये होमी भाभा यांच्या निधनानंतर बंगल्याची मालकी त्यांची बंधू आणि  नॅशनल सेंटर ऑफ परफोर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) या संस्थेचे संस्थापक जमशेद भाभा यांच्याकडे गेली होती. २००७ मध्ये जमशेद भाभा यांचे निधन झाल्यावर एनसीपीए व्यवस्थापनाकडे बंगल्याचे अधिकार गेले होते. गेल्या काही महिन्यांपासून एनसीपीएने या बंगल्याचा लिलाव करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र भाभा अ‍ॅटोमिक सेंटरच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कर्मचा-यांनी या लिलावाला विरोध दर्शवला होता. हा बंगला म्हणजे ऐतिहासिक वास्तू असून भाभा बंधूंच्या निधनानंतर या बंगल्यात अणू उर्जेसंदर्भातील म्यूझियम करावे अशी मागणी केली जात होती. यासंदर्भात कोर्टातही याचिका दाखल झाली होती. हायकोर्टाने लिलावावर रोख लावण्यास नकार दिला. या याचिकेवर पुढील सुनावणी २३ जूनरोजी होणार आहे. 
मलबार हिल येथील या तीन मजल्यासाठी एका व्यक्तीने ३७५ कोटी रुपयांची बोली लावली आहे. या व्यक्तीलाच बंगला विकला जाणार असून त्याचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. 

Web Title: Homi Bhabha's bungalow fetches Rs 375 crore