राज्यात गुलाबी थंडीत जाणवतोय उकाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 08:25 PM2019-11-30T20:25:07+5:302019-11-30T20:27:35+5:30

ऐन थंडीत उकाडा जाणवू लागला आहे़....

hit in winter season at state | राज्यात गुलाबी थंडीत जाणवतोय उकाडा

राज्यात गुलाबी थंडीत जाणवतोय उकाडा

Next
ठळक मुद्देअरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र : तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे : या हंगामात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान नेहमीपेक्षा थंडीचे प्रमाण कमी असेल, असा हवामान विभागाचा अंदाज जाहीर झाला असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे़. त्यामुळे ऐन थंडीत उकाडा जाणवू लागला आहे़.

राज्यात मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे़. कोकणात ३ ते ४ आणि मराठवार्डयात २ ते ५ अंश तर विदर्भात १ ते ३ अंश सेल्सिअसने किमान तापमानात वाढ झाली आहे़. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३४.८ तर सर्वाधिक किमान तापमान अहमदनगर येथे ११.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ २ ते ४ डिसेंबर दरम्यान कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने हिंदी महासागरात विषृववृत्तीय भागात व त्याच्या लगतच्या अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़ त्याचवेळी लक्ष्यद्वीप बेटांच्या समुहाजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे़. त्यामुळे लक्ष्यद्वीप, केरळ, तामिळनाडु, पाँडेचरी भागात पाऊस होत आहे़. त्याचा परिणाम दक्षिणेकडील वाºयांचा जोर वाढला असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे़. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागातील कमाल व किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे़. यंदा सातत्याने अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यातील तापमानात अभावाने घट झाली आहे़. राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली आहे़. दिवसाही अनेक ठिकाणी उकाडा जाणवत होता़ ब्रम्हपुरी येथे शनिवारी ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली़ ती सरासरीच्या तुलनेत ३़५ अंश सेल्सिअसने अधिक आहे़. 
रविवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहिल़ २ ते ४ डिसेंबरदरम्यान कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. 
़़़़़़़़़
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे १७.४, लोहगाव १९.२, अहमदनगर ११.२, जळगाव १८, कोल्हापूर २१.१, महाबळेश्वर १६.५, मालेगाव १८.६, नाशिक १७.३, सांगली २१.१, सातारा १७.६, सोलापूर २१.५, मुंबई २३.५, अलिबाग २३.६, रत्नागिरी २४.८, पणजी २४.४, डहाणु २३, उस्माऱ्या नाबाद १४.८, औरंगाबाद १६.९, परभणी १७.२, नांदेड १७, बीड १९.५, अकोला १६.९, अमरावती १७, बुलढाणा १७.६, ब्रम्हपुरी १७.३, चंद्रपूर १८.६, गोंदिया १५.४, नागपूर १५.८, वाशिम १७, वर्धा १७.५, यवतमाळ १६.४़
                    

Web Title: hit in winter season at state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.