शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हिरानंदानी हेल्थ केअरला पुन्हा दणका

By admin | Updated: January 7, 2017 06:14 IST

सवलतीच्या दरात भूखंड घेत त्याच भूखंडावर सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करणाऱ्याहिरानंदानी हेल्थ केअर प्रा. लि. ला उच्च न्यायालायनेही दणका दिला.

मुंबई: सवलतीच्या दरात भूखंड घेत त्याच भूखंडावर सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करणाऱ्याहिरानंदानी हेल्थ केअर प्रा. लि. ला उच्च न्यायालायनेही दणका दिला. भूखंड परत घेण्याबाबत राज्य सरकारने नवी मुंबई महापालिकेला दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमिवर महापालिकेने बजावलेली ‘कारणे-दाखवा’ नोटीस योग्य असून त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.‘ना-नफा, ना- तोटा’ तत्वावर सामान्यांसाठी रुग्णालय सुरू करण्यासाठी सिडकोने १९९६ मध्ये नवी मुंबई महापालिकेला वाशी येथील सेक्टर १० (अ) मध्ये भूखंड दिला. हाच भूखंड महापालिकेने हिरानंदानी हेल्थ केअरला भाडेतत्वावर दिला. मात्र याठिकाणी सामान्यांसाठी रुग्णालय सुरू न करता सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात आले. या फसवणुकीबाबत नवी मुंबईचे सामाजिक कार्यर्ते संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेमुळे जाग आलेल्या सरकारने संबंधित भूखंड ताब्यात घेण्याचा आदेश महापालिकेला आॅक्टोबर २०१६ मध्ये दिले. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने हिरानंदानी हेल्थ केअरला ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. या नोटीसला हिरानंदानी हेल्थ केअरने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याशिवाय रुग्णालयाच्या इमारतीलगतचा भूखंडाचा ताबा सिडकोने घेतल्याने त्याबाबत अर्जही केला. या भूखंडावर महापालिकेचाही अधिकार नाही. हा भूखंड सिडकोचा आहे. त्यामुळे त्यांनी घातलेल्या अटी-शर्तींचे पालन केलेच पाहिजे. त्यादृष्टीने राज्य सरकारने दिलेला आदेश आणि त्यानुसार महापालिकेने बजावलेली कारणे-दाखवा नोटीस योग्य आहे. रुग्णालयाच्या इमारतीलगत असलेल्या भूखंडावर फसवणूक करून सर्व प्लान्ट बांधण्यात आले आहेत. मुळातच हा भूखंड सिडकोचा आहे. त्यामुळे महापालिकेकडून परवानगी न घेता सिडकोकडून परवानगी घेणे आवश्यक होते. आम्ही या भूखंडावरील सर्व प्लान्ट हलवण्यासाठी आम्ही रुग्णालयाला तीन महिन्यांची मुदत देत आहोत. या कालावधीत रुग्णालयाने प्लान्ट हलवले नाहीत तर सिडको नोटीस न देताच हे बांधकाम हटवू शकते, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने याचिका आणि अर्ज फेटाळले. (प्रतिनिधी)