शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणकर्ते मागणार होते पाच कोटी

By admin | Updated: February 5, 2015 01:05 IST

पाचपावली पोलिसांच्या तावडीत अडकलेले आरोपी एका प्रॉपर्टी डीलरच्या १४ वर्षीय मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणार होते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

प्रॉपर्टी डीलरच्या मुलाचे अपहरण प्रकरण नागपूर : पाचपावली पोलिसांच्या तावडीत अडकलेले आरोपी एका प्रॉपर्टी डीलरच्या १४ वर्षीय मुलाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणार होते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मंगळवारच्या सायंकाळी डिओने तीन अल्पवयीन मुले संशयास्पद स्थितीत जाताना गवसताच पोलिसांनी त्यांना अडवले होते. त्यांच्या झडतीत रंगीत स्प्रे आढळून येताच पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत त्यांनी पाच कोटींच्या खंडणीसाठी प्रॉपर्टी डीलरच्या मुलाच्या अपहरणाची योजना उघड केली. दरम्यान, हे आरोपी पोलिसांच्या हाती लागण्यास तासभर विलंब झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता, असेही उघड झाले. या अपहरणकर्त्या टोळीचा सूत्रधार बाराव्या वर्गात शिकणारा १७ वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला असून, तो कधी आईकडे तर कधी वडिलांकडे राहतो. त्यामुळेच तो वाममार्गाला लागला. त्याने डिओ चोरण्यापूर्वी तीनचाकी वाहन चोरले होते. परंतु या वाहनाची विक्रीच झाली नव्हती. त्यामुळे त्याने मोठे काम करण्याची शक्कल लढवली. त्याची एका प्रॉपर्टी डीलरवर नजर होती. त्याच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याची या अपहरणकर्त्याला माहिती होती. हा प्रॉपर्टी डीलर आपल्या मुलावर अतोनात प्रेम करतो, असेही त्याला माहीत होते. या मुलाचे अपहरण केल्यास आपले नशीबच बदलून जाईल आणि पाच कोटी रुपये हा प्रॉपर्टी डीलर सहज देऊ शकतो, असे त्याला वाटत होते. आठवडाभरापूर्वीच त्याने आपल्या चार साथीदारांसोबत एकत्र बसून अपहरणाची योजना आखली होती. त्याने सर्वांना त्यांची कामे वाटून दिली होती. या प्रॉपर्टी डीलरला दोन मुले आणि दोन मुली आहेत. सर्वात लहान मुलगा १४ वर्षांचा तो आठव्या वर्गात शिकतो. तो आणि त्याची मोठी बहीणही एकाच शाळेत शिकतात आणि पायीच एकत्रच शाळेत जातात; त्यामुळे अपहरणकर्त्यांनी या मुलाचे अपहरण करण्याची योजना आखली होती. अपहरणकर्त्यांनी प्रॉपर्टी डीलरच्या भावाचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला होता. अपहरणासाठी त्यांनी मोतीबाग भागातून डिओ मोपेड चोरली होती. डिओचा रंग बदलण्यासाठी त्यांनी सेंट्रल एव्हेन्यूवरून २०० रुपयात दोन रंगीत स्प्रे खरेदी केले होते. त्यांच्याकडील रंग सायकलचा असल्याने एका पेंटरने डिओला पेंट करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ते दुसरा पेंटर शोधू लागले आणि पोलिसांच्या तावडीत अडकले. दुपारी १२ वाजताच्या सुमारास अपहरण करण्याची या टोळीची योजना होती. याच काळात हा मुलगा शाळेतून घराकडे परतायचा. परंतु त्यांची वेळ चुकली आणि ज्या मुलाचे ते अपहरण करणार होते तो आपल्या घरी परतला होता. त्यानंतर त्यांनी सायंकाळच्या वेळी अपहरणाची योजना आखली होती. मुलगा सायंकाळी ५ वाजता मोमीनपुरा कब्रस्तानमार्गे मदरसा येथे जातो, असे त्यांना समजले होते. मुलाचे अपहरण केल्यानंतर दोघे त्याला वर्धा मार्गाने घेऊन जाणार होते. त्यानंतर प्रॉपर्टी डीलरला जाफरनगरच्या स्विमिंग पुलाजवळ बोलावून त्याच्याकडून खंडणी वसूल केली जाणार होती. (प्रतिनिधी)