शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधल्या पेठमध्ये संततधार सुरूच, कोहोर परिसरात सर्वाधिक पाऊस

By admin | Updated: July 11, 2016 16:40 IST

कालपासून कोसळणारा संततधार पाऊस सोमवारी दिवसभर सुरूच राहिल्याने तीन दिवसापासून सुर्यदर्शन झाले नसून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

पेठ (नाशिक), दि. 11-  कालपासून कोसळणारा  संततधार पाऊस सोमवारी दिवसभर  सुरूच राहिल्याने तीन दिवसापासून सुर्यदर्शन झाले नसून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीत कोहोर भागात सर्वाधिक पाऊस पडला असून 209 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पेठ -187.5, तर जोगमोडी  परिसरात 169 मिमी पाऊस कोसळला आहे. यामूळे तालुक्यातील धरणांच्या पातळीत झापाट्याने वाढ होत असून नद्यानाले ओसंडून वाहत आहेत. रविवारी संगमेश्वर, खंबाळे, हातरूंडी, अंबापूर, निरगूडे, कोहोरकडे जाणाऱ्या फरशी पूलावरून पूराचे पाणी वेगाने वाहत असल्याने तीन चार तास वाहने अडकून पडली होती. तर भुवन घाटात दगडमातीचा भराव खचल्याने काही काळ वाहतूक खोळंबल्याचे सांगण्यात आले.शेतीची कामे ठप्प

तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतीचे कामेही ठप्प झाली असून भातशेतीच्या खाचरांचे ( आवण) तलाव झाल्याने औत फिरवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामूळे शेतकरी या पावसाने सुखावला असला तरीही मशागतीस ऊशीर होत असल्याने पाऊस कमी होण्याची प्रतिक्षा आहे. पेठ तालुक्यातील दमणगंगा सह लहान मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत असून तीव्र उतार व डोंगरदयामूळे गुजरात राज्याकडे मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.