शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ, राणे यांच्याकडून हायकोर्टास हवे उत्तर

By admin | Updated: March 10, 2015 05:16 IST

शिक्षण संस्थांसाठी सरकारकडून कवडीमोल भावात भूखंड घेतल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश

मुंबई : शिक्षण संस्थांसाठी सरकारकडून कवडीमोल भावात भूखंड घेतल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांना सोमवारी दिले़कॅग अहवालाचा दाखला देत पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे़ भुजबळ, राणे यांच्यासह राधाकृष्ण विखे-पाटील, पतंगराव कदम, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शिक्षण संस्था उघडण्यासाठी सरकारकडून कमी भावात भूखंड घेतले, असे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात विखे-पाटील व कदम यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून हे आरोप फेटाळले़ नियमानुसारच सरकारकडून भूखंड घेतल्याचा दावा या दोघांनीही केला आहे़ मात्र भुजबळ व राणे यांनी याचे प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने खंडपीठाने त्यांना यासाठी येत्या १० एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे़ (प्रतिनिधी)