शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून प्रचाराला मिळतो कमी अवधी

By admin | Updated: August 24, 2016 20:29 IST

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर होऊन प्रभागांच्या फेररचनेची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे़

ऑनलाइन लोकमत

मुंबई , दि. 24  - महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर होऊन प्रभागांच्या फेररचनेची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे़ मात्र आरक्षणाच्या कचाट्यातून आपला वॉर्ड सुटला तरी फेररचनेत काय होईल, या भीतीने नगरसेवक धास्तावले आहेत़ त्यातच प्रभागांची फेररचना नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होणार आहे़ या बदलेल्या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी केवळ दोन ते तीन महिन्यांचा वेळ मिळत असल्याने नगरसेवकांचे टेन्शन वाढले आहे़.

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे़ यामुळे इच्छुक नगरसेवक व पक्षातील कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ मात्र प्रचाराला सुरुवात करण्याआधी आरक्षणाची सोडत आणि त्यात आता प्रभागांची फेररचनेकडे नगरसेवक डोळे लावून बसले आहेत़ सोडतीमध्ये आपल्या वॉर्ड महिला अथवा मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित झाल्यास जवळच्या वॉर्डांमध्ये चाचपणी करण्यास नगरसेवकांनी यापूर्वीच सुरुवात केली आहे़  .

सणासुदीचा काळ हा मतदारसंघामध्ये प्रचारसाठी, घरोघरी पोहोचण्याकरिता बेस्ट असल्याने फेरचनेची प्रक्रिया त्यापूर्वी पूर्ण व्हावी, अशी नगरसेवकांना आशा होती़ मात्र प्रभाग फेररचनेचे निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर होत असल्याने नगरसेवकांची सर्व गणित बिघडली आहेत़ त्यातही आशावादी असलेल्या नगरसेवकांनी आपल्या व बाजूच्या वॉर्डात नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे़.