शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे हेलिपॅडने जोडणार

By admin | Updated: May 20, 2015 01:49 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हेलिपॅडने जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील नऊ ठिकाणी हेलिपॅड प्रस्तावित केली

अनंत जाधव ल्ल सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हेलिपॅडने जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील नऊ ठिकाणी हेलिपॅड प्रस्तावित केली असून, आणखी काही जागेच्या शोधात आहे. ही सर्व हेलिपॅड महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर करण्यात येणार आहेत.सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा होऊन १७ वर्षे झाली; पण या जिल्ह्यात पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ठोस भूमिका घेण्यात आली नाही. मात्र युती सरकारने सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला प्राधान्य दिले आहे. केंद्र सरकारने जिल्ह्णातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे सध्या युद्धपातळीवर पर्यटनस्थळे शोधण्यात येत आहेत. या नऊ जागांचे प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केले असून, हे प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. केंंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे. बांधकाम विभाग या नऊ जागांव्यतिरिक्त आणखी काही जागा घेण्यास तयार असून, सर्व पर्यटनस्थळे हेलिपॅडने जोडली, तर एखाद्या उद्योजकाला किंवा पर्यटकाला सिंधुदुर्गमध्ये हेलिकॉप्टरने आल्यास अनेक फायदे होणार आहेत.येथे होणार हेलिपॅड...जिल्ह्यातील शिरोडा, आंबोली, सावंतवाडी, मिठबाव, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले, तिलारी आदी ठिकाणी हेलिपॅड होणार असून, प्रत्येक हेलिपॅडसाठी एक एकर जागा संपादित केली जाईल. अद्याप प्रस्ताव नाहीहेलिपॅडचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या करीत असून, सद्य:स्थितीत नऊ प्रस्ताव तयार झाले आहेत. खासगी व्यक्तींनी पुढे येऊन आपली जागा दिल्यास त्यात हेलिपॅड तयार करण्यात येणार असून, अद्यापएकही तसा प्रस्ताव आला नाही़- प्रकाश शिंदे,कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग़