शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 8:04 PM

उत्तर भारतात अतिवृष्टीचा इशारा

ठळक मुद्देमहाबळेश्वरमध्ये बुधवारी दिवसभरात जोरदार वृष्टी

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून पुढील तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात रत्नागिरी १४०, कणकवली १३०, माथेरान १२०, रोहा, ठाणे ११०, कल्याण, मालवण १००, बेलापूर, देवगड, दोडामार्ग, मुरुड, पनवेल, सांगे, सावंतवाडी, उरण ९०, पालघर, पेडणे, केपे, रामेश्वर, वाडा ८०, हरनाई, जव्हार, खालापूर, महाड, माणगाव, शहापूर, सुधागड पाली, वेंगुर्ला ७०, अंबरनाथ, कर्जत, म्हसळा, मुंबई (सांताक्रुझ), पुणे, उल्हासनगर, वैभववाडी ६०, वसई, विक्रमगड ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रात आजारा, राधानगरी १२०, चांदगड १००, गगनबावडा, लोणावळा ९०, महाबळेश्वर ८०, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, वेल्हे ७०, गडहिंग्लज ६०, गारगोटी, पन्हाळा ५० मिमी पाऊस पडला. मराठवाड्यातील घनसावंगी, माहूर ३०, अंबड, अर्धापूर, आष्टी, औंधा नागनाथ, गेवराई, हदगाव, हिंगोली, नांदेड, परंडा, पाटोदा २० मिमी पाऊस झाला. विदर्भात देऊळगाव राजा, जळगाव जामोद, मालेगाव, मलकापूर, रिसोड, सिंधखेड राजा येथे १० मिमी पाऊस पडला़ घाटमाथ्यावरील ताम्हिणी ११०, शिरगाव, अम्बोणे, दावडी ९०, खोपोली ८०, कोयना, धारावी ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने ९ ते ११ जुलै दरम्यान पंजाब, हरियाना, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार, हिमालयीन रांगा, ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ९ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

महाबळेश्वरला दिवसभरात ९६ मिमीबुधवारी दिवसभरात महाबळेश्वरमध्ये जोरदार वृष्टी झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९६ मिमी पावसाची नोंद झाली होती. रत्नागिरी ५१, पणजी ४५, मुंबई ५, सांताक्रुझ १२, सोलापूर ३३, कोल्हापूर ५, परभणी १७, अकोला ९, अमरावती व पुणे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी