शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला

By हणमंत पाटील | Published: May 06, 2024 12:02 AM

मिरजेत निवडणुकीनिमित्त संवाद मेळावा

हणमंत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, मिरज: स्वप्न दाखवणारा नेता जनतेला आवडत असतो; मात्र स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्याला जनता उखडूनसुद्धा टाकते. जे नेते आपल्या कर्तृत्वावर निवडून येऊ शकत नाहीत तेच जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करतात, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

भाजप उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ मिरजेत संवाद मेळावा पार पडला. यावेळी गडकरी म्हणाले की, इंधन व विजेऐवजी हायड्रोजनचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. पेट्रोल पंपाप्रमाणे हायड्रोजन स्टेशन रस्त्यावर उपलब्ध असतील. विकसित भारतात जल, जमीन व जंगल याच्या आधारावर अर्थव्यवस्थेचा विचार करून शेतकऱ्याला समृद्ध केले जात आहे.

काँग्रेसचे आर्थिक धोरण भंगारात गेले. विकासाचे कुठलेही व्हिजन काँग्रेसकडे नव्हते. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. कॉंग्रेसच्या काळात जलसिंचनाच्या योजना रखडल्या होत्या. रस्त्यांची कामे होत नव्हती. या परिस्थितीत २०१४ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर जलसिंचन, रस्ते व पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. जलसिंचन योजना गतीने राबविल्यामुळे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात हरितक्रांती झाली. सगळीकडे पाणी पोहोचले. मी जलसंपदा मंत्री असताना बळीराजा संजीवन योजनेतून नऊ हजार कोटी आणि प्रधानमंत्री कृषी संजीवन योजनेतून ११ हजार कोटी रुपये जलसिंचनाकरिता दिल्याने लाखो एकर जमीन पाण्याखाली आली. जिल्ह्यात जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांत जलसिंचन योजनांमुळे आमूलाग्र बदल झाला.

गडकरी म्हणाले, गरिबी दूर करणारा, सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारा, गरिबांचे कल्याण करणारा भाजप व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू व्हायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. विसाव्या शतकात अमेरिका सुपर पॉवर झाला. २१वे शतक भारताचे आहे. शेती उद्योग, निर्यात यावर भर दिल्याने २५ कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री दीपक शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार रमेश शेंडगे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sangli-pcसांगलीNitin Gadkariनितीन गडकरी