शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅम्पा कोला’ प्रकरणाची आज सुनावणी

By admin | Updated: June 3, 2014 01:08 IST

वरळी येथील वादग्रस्त कॅम्पा कोला सोसायटीतील अनधिकृत मजले वाचवण्यासाठी तेथील रहिवाशांनी दाखल केलेल्या नवीन याचिकेवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत होणार आह़े

मुंबई : वरळी येथील वादग्रस्त कॅम्पा कोला सोसायटीतील अनधिकृत मजले वाचवण्यासाठी तेथील रहिवाशांनी दाखल केलेल्या नवीन याचिकेवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत होणार आह़े या सुनावणीकडे सोसायटीतील 35 अवैध मजल्यांवरील 14क् फ्लॅटधारकांसह सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आह़े
विशेष म्हणजे येथील रहिवाशांच्या नवीन याचिकेवर सुनावणी घेणार असल्याचे गेल्या आठवडय़ात जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाने सोसायटीच्या अनधिकृत मजल्यांवरील कारवाईला कोणतीही स्थगिती दिली नव्हती़ असे असतानाही महापालिकेने या मजल्यांवर कारवाई करण्याची कोणतीही ठोस पावले उचली नसल्याचे तूर्तास तरी चित्र होत़े कारण अगदी सोमवार्पयत अवैध मजल्यांवर राहणा:या रहिवाशांनी फ्लॅटची चावी पालिकेकडे जमा केली नव्हती़
 मात्र अगदी शेवटच्या क्षणी जागी झालेल्या पालिकेने आता या रहिवाशांविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल करण्याची तयारी केली असल्याची चर्चा होती़ दरम्यान, याबाबत अधिकृतरीत्या माहिती देण्यास पालिकेचा कोणताही अधिकारी तयार नव्हता़ ‘लोकमत’ने पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्याशी वारंवार संपर्क साधला़ पण ते उत्तरासाठी उपलब्ध झाले नाहीत़ गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या सोसायटीतील अवैध मजल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल़े त्यानंतर आज वर्षभर ही कारवाई काही झाली नाही़ अखेर गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने येथील रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी अंतिम मुदत दिली़ ही मुदत संपत असतानाच पुन्हा येथील रहिवाशांनी अवैध मजले अधिकृत करण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावल़े 
या वेळी या रहिवाशांनी माहितीच्या अधिकाराचा दाखल देत राज्य शासन व पालिकेनेच अवैध बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला आह़े तसेच हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करावे व तोर्पयत या मजल्यांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आह़े त्यामुळे आता न्यायालय नव्याने काय आदेश देणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े 
 
आयुक्तांसोबत बैठक झाली
कॅम्पा कोला कम्पाउंड रहिवासी संघटनेच्या प्रवक्त्या नंदिनी मेहता म्हणाल्या, की सोमवारी रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालिका आयुक्त कुंटे व रहिवाशांची मंत्रलयात बैठक पार पडली़ त्यात आयुक्त कुंटे यांनी मंगळवारी पालिका कोणतीही कारवाई करणार नसून, कॅम्पा कोला रहिवाशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगितल़े