शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सुना सुना शोकप्रस्ताव.!

By admin | Updated: June 4, 2014 00:56 IST

गोपीनाथ मुंडे यांच्या धक्कादायक अपघाती निधनानंतर मांडला गेलेला शोकप्रस्ताव मात्र कायदेशीर आणि तांत्रिक कचाटय़ात अडकला.

विधान भवनच्या भिंती त्यांच्या घणाघाती भाषणाच्या साक्षीदार होत्या़ माइकना त्यांच्या खुमासदार भाषणांची, किश्श्यांची सवय लागलेली होती़ सभागृहातल्या बाकांनी त्यांच्या भाषणांमुळे स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती़ त्या गोपीनाथ मुंडे यांच्या धक्कादायक अपघाती निधनानंतर मांडला गेलेला शोकप्रस्ताव मात्र कायदेशीर आणि तांत्रिक कचाटय़ात अडकला. त्याहीपेक्षा दुर्दैव म्हणजे सभागृहाचे नेते, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शोकप्रस्ताव मांडत असतानाच विरोधी बाकावरील भाजपा-सेनेचे सदस्य उठून बाहेर गेलेले पाहणो याच सभागृहाच्या नशिबी आले. एकेकाळी हेच सभागृह गाजविणा:या नेत्याचा शोकप्रस्ताव देखील मुका मुकाच राहिला..
 
अतुल कुलकर्णी ल्ल मुंबई
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची बातमी सकाळीच आली होती, मात्र सरकारला अधिकृत सूचना मिळाली नव्हती. त्यामुळे सभागृह सुरू झाल्यानंतर आधी एक तासासाठी तहकूब केले गेले. अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील यांच्या दालनात बैठक झाली. सभागृहाचे कामकाज आज तहकूब करा, उद्या अंत्ययात्रेसाठी जायचे असल्याने सभागृहाला सुटी द्या आणि परवा शोकप्रस्ताव मांडा, असे विरोधकांचे मत होत़े मात्र तीन दिवस सभागृह कसे बंद ठेवायचे, असा मुद्दा पुढे आला आणि चर्चा सुरू झाली तोच राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी केंद्राने पाठवलेले नोटिफिकेशन घेऊन आले. 
मुंडे यांचे निधन झाल्याची अधिकृत सूचना सभागृहाला मिळालेली होती. अशावेळी शोकप्रस्ताव न मांडता सभागृहाचे कामकाज कसे बंद पाडायचे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. शोकप्रस्ताव मुख्यमंत्री मांडतील आणि श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज तहकूब केले जाईल, असे ठरले. दरम्यान, पुन्हा एकदा विधानसभेचे कामकाज एक तासासाठी तहकूब केले गेले. तिकडे विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकप्रस्ताव वाचण्यास सुरुवात केली होती. तेथे गृहराज्यमंत्री सतेज पाटील निरोप घेऊन गेले आणि परिषदेचे कामकाजही एक तासासाठी तहकूब केले गेले. 
खडसे यांची भूमिका स्पष्ट होती. ते म्हणत होते, जोर्पयत अंत्यसंस्कार होत नाहीत तोर्पयत शोकप्रस्ताव आणू नये. त्यावर गृह खात्याचे नोटिफिकेशन आल्यानंतर असा प्रस्ताव मांडता येतो असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणो होते. आम्ही आमच्या दु:खात आहोत. आपण सभागृह तहकूब करा, अशी मागणी खडसे यांनी केली. गिरीश बापट यांचाही प्रस्ताव मांडण्यास विरोध होता. विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. त्यांना या प्रस्तावावर बोलता येणार नाही, असेही सांगून झाले. आम्ही सभागृह तहकूब करण्यासाठी काय कारण सांगायचे, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी बापट यांना विचारला. 
अखेर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शोकप्रस्ताव मांडला. तो मांडत असताना विरोधी बाकावर बसलेले काही सदस्य उठून निघून गेले. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा अध्यक्ष वळसे-पाटील म्हणाले, आता प्रस्ताव मांडून झाला आहे. सेंट्रल हॉलमध्ये सगळ्यांची एकत्रित शोकसभा घ्यायची आहे. तेव्हा आता चर्चा नको, असे सांगितले. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख काही बोलत असतानाच नारायण राणो म्हणाले, सभागृहात जे बोलले जाईल ते रेकॉर्डवर येते, सेंट्रल हॉलमध्ये झालेली भाषणो रेकॉर्डवर कशी येणार? तर अनिल गोटे यांनी विरोधी पक्ष सभागृहात नसताना कसा काय शोकप्रस्ताव येऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित केला. 
 
अध्यक्षांनी शोकप्रस्ताव मंजूर करीत श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी तहकूब करून टाकले. विधान परिषदेत मात्र हा प्रस्ताव मांडला गेला आणि तेथे सदस्यांनी भाषणो देखील सुरू केली. एका लोकनेत्याचा मृत्यू, त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने दोन दिवस सभागृह बंद ठेवून मनाचा मोठेपणा दाखवला असता, तर त्यात सरकारच मोठे झाले असते; पण ही संधी सरकारने गमावली हेच खरे.
 
विधान परिषदेत आदरांजली
मुंबई : सामान्य कुंटुंबात जन्मलेल्या गोपीनाथ मुंडे आपल्या अथक परीश्रमाने असामान्य नेते ठरले. उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या या नेत्याच्या जाण्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना, विधान परिषदेत व्यक्त करण्यात आली. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिषदेत मुंडे यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला.  गोपीनाथ मुंडे केवळ भाजपाचे नव्हे तर राज्याचे नेते होते. मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे मुंडे उत्तम संघटक, कुशल आणि हजरजबाबी नेते होते, असे पवार म्हणाले.  आज नियतीने आपला डाव साधला. अजूनही ते गेले यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने ओबीसी समाजाचा आत्माच हरपला, अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली. मुंडे यांच्या जाण्याने मुत्सद्दी नेता, कुशल राजकारणी आणि सामान्यांचा आवाज हरवल्याचे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे म्हणाले. यावेळी संसदीय कायर्मंत्री हर्षवर्धन पाटील, पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, आ. जयंत पाटील, हेमंत टकले आणि सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.