Coronavirus: आता हातावर मारणार निळ्या शाईचे शिक्के; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:58 PM2020-03-16T16:58:54+5:302020-03-16T17:01:27+5:30

कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या देशांमधून आलेल्या लोकांना A, B, C अशा कॅटॅगरीमध्ये ठेवले जाणार आहे.

Health Minister Rajesh Tope said that the Quarantined people will be stamp on their hands like election ink mac | Coronavirus: आता हातावर मारणार निळ्या शाईचे शिक्के; राज्य सरकारचा निर्णय

Coronavirus: आता हातावर मारणार निळ्या शाईचे शिक्के; राज्य सरकारचा निर्णय

Next

मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 38 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच आता घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या देशांमधून आलेल्या लोकांना A, B, C अशा कॅटॅगरीमध्ये ठेवले जाणार आहे.  A म्हणजे ज्यांच्यात लक्षण आहे त्यांना वेगळं ठेवलं जाणार. B मध्ये वयोवृद्ध आहे ज्यांना डायबिटीस, हायपर टेन्शन आहे त्यांना पण 14 दिवस क्वॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. 14 दिवस लक्षणं आढळली नाहीत तर ट्रीटमेंट होणार नाही. C मध्ये लक्षण नाही त्यांना घरी क्वॉरेंटाईन करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर निवडणुकीच्या शाईप्रमाणे शिक्का मारण्यात येईल. जेणकरुन  घरी क्वॉरेंटाईन केलेले लोकं जर बाहेर दिसले तर बाहेरील लोकांना समजेल की अशा व्यक्तींना घरी क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे. 

Coronavirus: महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण?... जाणून घ्या

राज्यात सध्या कोरोनाचे ३८ रुग्ण असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी चिंचवड आणि पुणे भागात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ९ जणांना कोरोनाची बाधा झाली असून पुण्यातल्या ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. राजधानी मुंबईत ६, तर उपराजधानी नागपुरात ४ रुग्ण आढळून आलेत. याशिवाय यवतमाळ, कल्याणमध्ये कोरोनाचे प्रत्येकी ३, नवी मुंबईत २, तर  रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे.  

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, दहावी-बारावी परीक्षा ठरल्यावेळेनुसार होणार आहेत. याशिवाय, सर्व निवडणुकाही पुढील तीन महिने स्थगित करण्यात याव्यात, अशी विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आला आहे. तसेच, राज्यात 100% शट डाऊन नाही. मात्र, शाळा आणि महाविद्यालये आता संपूर्ण राज्यभरात बंद करण्यात आली आहेत. मंत्रालयामध्ये सामान्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

Coronavirus : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Web Title: Health Minister Rajesh Tope said that the Quarantined people will be stamp on their hands like election ink mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.