मुख्याध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

By Admin | Updated: July 22, 2014 01:43 IST2014-07-22T01:43:54+5:302014-07-22T01:43:54+5:30

लोणार येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा 20 जुलैला हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

Headgear's heart disease death | मुख्याध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

मुख्याध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

लोणार/नाशिक/औरंगाबाद  : केबीसी आणि सुपर पॉवर या कंपन्यांमध्ये गुंतविलेले लाखो रूपये बुडाल्याने चिंतेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा 20 जुलैला हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विष्णू बळवंत लादे यांनी केबीसी आणि सुपर पॉवरमध्ये 12 ते 14 लाख रूपये गुंतविले होते. आता ही रक्कम परत मिळणार नसल्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले होते. रविवारी त्यांचा हृदयविकाराचा धक्क्याने मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचे जावई बाळू मानघाले यांनी दिली.
नाशिकमध्ये साडेचार हजार तक्रारी
आडगाव पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांच्या पोलीस कोठडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩयू़कापडी यांनी 24 जुलैर्पयत वाढ केली आह़े केबीसीचे संचालक बापूसाहेब चव्हाण, व्यवस्थापक व एजंट पंकज श्ंिादे, वाहनचालक नितीन शिंदे यांना सोमवारी तर नानासाहेब चव्हाण, साधना चव्हाण, पोलीस कर्मचारी संजय जगताप यांना मंगळवारी अटक झाली होती़ 
सोमवार्पयत तक्रारदारांची संख्या साडेचार हजारांर्पयत पोहोचली. फसवणुकीची रक्कम 137 कोटी झाली आहे. गुंतवणूकदारांनी छावा संघटनेच्या माध्यमातून केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीची स्थापना केली आह़े समितीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आह़े (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
करोडपती एजंट पोलिसांच्या रडारवर
गोरगरिबांना केबीसीच्या जाळ्यात अडकवून करोडपती झालेल्या शंभरपेक्षा अधिक एजंटची यादी औरंगाबाद पोलिसांकडे उपलब्ध आहे. हे करोडपती एजंट आता औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर आहेत. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर या एजंटांविरुद्ध गुन्हे नोंदवले जाऊ शकतात, असे गुन्हे शाखेचे प्रभारी साहाय्यक आयुक्त अविनाश अघाव यांनी सांगितले. 
 
नाशकातील पथक औरंगाबादेत येणार
केबीसीकडून गंडवल्या गेलेल्या औरंगाबादेतील नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथकच औरंगाबादेत बोलविण्यात येणार आहे. हे पथक गुरुवारी औरंगाबादेत येऊ शकते, असे आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. 

 

Web Title: Headgear's heart disease death