शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

मिल्खासिंगना भेटण्यासाठी त्याने पटकाविले ‘पदक’

By admin | Updated: April 2, 2015 01:26 IST

ओंकार राणेची जिद्द : स्पेशल आॅलिम्पिकमध्ये मिळविली दोन पदके

कोल्हापूर : एखाद्याच्या मनात दृढ इच्छाशक्ती असेल, तर ती कशी पुरी होते, याचा प्रत्यय कोल्हापुरातील मंगेशकरनगर येथील ओंकार राणे याला आला. ओंकारने न्यू कॅसलमध्ये झालेल्या स्पेशल आॅलिम्पिकमध्ये १०० मीटर धावणे प्रकारात रौप्यपदक, तर गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकाविले आणि त्याची मिल्खासिंग यांची भेट घेण्याची इच्छा पूर्ण झाली. चेतना विकास मंदिरमधील ओंकारची न्यू कॅसलमध्ये झालेल्या स्पेशल आॅलिम्पिकसाठी निवड झाली होती. या स्पर्धेसाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे वडील किरण व आई संगीता यांनी त्याला निरनिराळ्या स्पर्धांवर आधारित चित्रपट दाखविले. यामध्ये ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपटही होता. हा चित्रपट त्याला इतका आवडला की, तो वेळ मिळेल तेव्हा हाच चित्रपट पाहत होता. चित्रपट पाहून तो मिल्खासिंग यांच्यासारखा धावण्याचा सराव करू लागला.नेहमी मिल्खासिंगबाबत तो आईवडिलांकडे चौकशी करू लागला. यावेळी त्यांच्या आईवडिलांनी ‘तू जर या स्पर्धेत पदक पटकावलेस तर तुझी मिल्खासिंगसोबत भेट घडवून आणून देण्यात येईल,’ असा शब्द दिला. या एका शब्दावर त्याने या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत दोन पदके पटकाविली. घरी आल्यानंतर त्याने सतत मिल्खासिंगला कधी भेटविणार, असा तगादा लावला. आता भेट कशी घडवायची, असा प्रश्न राणे कुटुंबीयांना पडलेला असताना, योगायोगाने ‘आकाशवाणी’वर ‘जागरूक पालक’ या सदरात ओंकारच्या आईवडिलांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी ओंकारचा हा किस्सा त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितला. मुलाखत ऐकून कोल्हापुरातील बुरांडे यांनी मिल्खासिंग यांच्या पत्नीचा मोबाईल नंबर राणे कुटुंबीयांना मिळवून दिला. ओंकारच्या आईनी त्यांच्याशी संपर्क साधून, सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी चंदिगड येथे भेटण्याचे आमंत्रणही दिले. २६ फेब्रुवारी रोजी मिल्खासिंग यांच्या चंदिगडच्या घरी आम्ही भेटण्यासाठी गेलो. यावेळी मिल्खासिंग यांनी सुद्धा आपुलकीने त्यांचे कौतुक करून घरामध्ये जेवण देऊन दोन-तीन तास मनसोक्त गप्पा मारून त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले.ओंकार, तू देश का बेटा...ओंकारची जेव्हा त्याच्या आईवडिलांसोबत मिल्खासिंग यांच्या घरी भेट झाली, तेव्हा मिल्खासिंग यांनी ‘ओंकार, तू सिर्फ किसी गाव का बेटा नहीं, अब तू देश का बेटा है। तुझे और भी पदक जितने हैं।’ अशा शब्दांत त्याचे कौतुक केले, तेव्हा ओंकारच्या आईवडिलांच्या डोळ्यांत पाणी आले. मी व ओंकारचे वडील आम्ही दोघेच त्याचा रोज टेनिस, धावण्याच्या सराव करून घेत होतो. मी घरातील काम करीत असताना त्याच्याकडून दोरी उड्या घेत होते. मात्र, ओंकारची व मिल्खासिंग यांची भेट होईल, असे कधीच वाटत नव्हते. मात्र, देवाच्या कृपेने ती भेट घडून आली. - संगीता राणे (ओंकारची आई)