विद्याथ्र्याबरोबर स्वत:ही शिकलो

By Admin | Updated: September 16, 2014 00:37 IST2014-09-16T00:37:16+5:302014-09-16T00:37:16+5:30

गेल्या चाळीस वर्षापासून स्वरसाधना करीत आहे. दिवसातील किमान सात ते आठ तास तंबो:यासह असतो. विद्याथ्र्याना शिकवताना स्वत:ही बरेच शिकत गेलो.

He has learned himself with Vidyalath | विद्याथ्र्याबरोबर स्वत:ही शिकलो

विद्याथ्र्याबरोबर स्वत:ही शिकलो

पुणो : ‘‘गेल्या चाळीस वर्षापासून स्वरसाधना करीत आहे. दिवसातील किमान सात ते आठ तास तंबो:यासह असतो. विद्याथ्र्याना शिकवताना स्वत:ही बरेच शिकत गेलो. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार ही कौतुकाची थाप आणि आशीर्वाद वाटतो,’’ अशी भावना ज्येष्ठ गायक पं. विजय कोपरकर यांनी रविवारी व्यक्त केली. 
गानवर्धन संस्थेतर्फे आयोजित व तात्यासाहेब नातू फाउंडेशन पुरस्कृत स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार पं. कोपरकर यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, लता साठे, सारंग नातू, पं. वसंतराव गाडगीळ व रवींद्र दुर्वे उपस्थित होते.
पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी व पं. मधुसूदन पटवर्धन या तीन गुरूंचे मार्गदर्शन लाभल्यामुळे या क्षेत्रत वाटचाल करू शकलो, अशी आदराची भावना पं. कोपरकर यांनी व्यक्त केली. आपल्या वाटचालीबद्दल त्यांनी आईलाही श्रेय दिले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, अशा शब्दांत त्यांनी आठवणी जागवल्या. व्यवहारिक जगात संगीत हे वेड आहे. या जगातील यशाचे मापदंड वेगळे असतात, असे पं. कोपरकर म्हणाले.  
पं. वसंतराव गाडगीळ व डॉ. शेजवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या कोषाध्यक्षा लता साठे यांच्या एकाहत्तरीनिमित्त त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शाीय संगीताची मैफल रंगली. (प्रतिनिधी) 
 
प्रत्येक वाढदिवस हा सुरेल व संगीतमय 
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी शनिवारी 83व्या वर्षात पदार्पण केले. वाढदिवसानिमित्त गुणी कलाकारांच्या सत्काराची संधी मिळते. या पुरस्काराने माङयाच कार्याचा गौरव होतो, असे वाटते. त्यामुळे प्रत्येक वाढदिवस हा सुरेल व संगीतमय असतो, अशी भावना डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली. कलाकार व श्रोते हे नाते मोठे असते, असे त्या म्हणाल्या.

 

Web Title: He has learned himself with Vidyalath