...अखेर त्याने दुसऱ्या पत्नीलाही स्वीकारले!
By Admin | Updated: February 15, 2015 00:43 IST2015-02-15T00:43:48+5:302015-02-15T00:43:48+5:30
संगमेश्वर येथील लक्ष्मण पवार यांनी अखेर सुखाचा संसार करण्याचे महिला साहाय्य कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वचन देऊन दुसऱ्या पत्नीला घरी नेले.

...अखेर त्याने दुसऱ्या पत्नीलाही स्वीकारले!
जळगाव : पहिली पत्नी हयात असतानाही दुसरे लग्न करून दुसऱ्या पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमेश्वर येथील लक्ष्मण पवार यांनी अखेर सुखाचा संसार करण्याचे महिला साहाय्य कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वचन देऊन दुसऱ्या पत्नीला घरी नेले.
पिंपळगाव हरेश्वर येथील प्रतिभा लक्ष्मण पवार (मूळ नाव परवीन शाह शब्बीर) यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी लक्ष्मण पवार यांच्याशी झाला होता.त्यानंतर कोपरगाव परिसरातील देवीच्या मंदिरावर हिंदू विवाह पद्धतीनुसार त्यांचा विवाह झाला होता़ लग्नापूर्वी काही दिवस आधी पवार यांचा विवाह झाला असल्याचे प्रतिभा यांना समजले. तरीही त्यांनी त्यांना स्वीकारले़ मात्र नंतर पवार यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली़ त्यांना व त्यांच्या मुलाला वाऱ्यावर सोडून पवार निघून गेले होते़ त्यानंतर प्रतिभा यांनी महिला दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला होता़ सुरुवातीला पवार यांनी टाळाटाळ केली़ मात्र पदाधिकाऱ्यांनी खाक्या दाखविल्यानंतर दहा दिवसानंतर ते जळगावला आले. प्रतिभा यांना दहा दिवसांसाठी आशादीप वसतीगृहात ठेवण्यात आले होते़ पदाधिकाऱ्यांनी दोघांच्या वादात मध्यस्थी केली़ त्यानंतर पती-पत्नीमध्ये तडजोड झाली़ प्रतिभा यांना सुखात नांदविण्याचे लेखी आश्वासन देऊन पवार त्यांना संगमेश्वर येथे घेऊन गेले़ (प्रतिनिधी)