शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करायचं बर कां! की इंग्लिशमध्ये सांगू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 13:21 IST

सैराटफेम आर्ची अन परश्या म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर निवडणूक आयोगाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ -  'मराठीत सांगितलेलं समजतं ना की इंग्लिशमध्ये सांगू?'  सैराटमधला हा फेमस डायलॉग घेऊन आर्ची-परशा पुन्हा तुमच्या भेटीला येणारेत..!  अहो, एवढे उत्साहित होऊ नका, आर्ची-परशाचा नवा  पिक्चर येत नाहीये हे खरं, पण ते पुन्हा तुम्हाला भेटायला येणारेत ते मतदानाचे महत्व पटवण्यासाठी... आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि परश्या, म्हणजेच सगळ्यांचा लाडका आकाश ठोसर हे दोघेही निवडणूक आयोगाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले आहेत.  आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने ही अनोखी शक्कल लढवली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करा, असं आवाहन आर्ची-परश्या मतदारांना करणार आहेत. 
(आर्ची-परश्याच्या प्रेमाची साक्षीदार असलेली ' ती' फांदी तुटली)
  •  
 
महाराष्ट्रातील तरुणवर्ग मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रियेत मागे पडत आहे. तीन टक्के तरुणाईपैकी फक्त 1.1 टक्के मतदार या प्रक्रियेत सहभागी होतात. राज्यात ८.३४ कोटी मतदार असून त्यापैकी १२.१६ लाख नोंदणीकृत मतदार आहेत. मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी आणि भावी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही शक्कल लढवली असून रिंकू आणि आकाश निवडणूक आयोगाच्या बॅनरवरही झळकले आहेत. त्या दोघांनाही ब्रँड अॅम्बेसेडर करण्यासाठी 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनीही आनंदाने परवानगी दिली, अशी माहिती  निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी दिली.