विदर्भवाद्यांना फटके हाणू - नितेश राणे

By Admin | Updated: August 24, 2016 18:47 IST2016-08-24T18:47:21+5:302016-08-24T18:47:21+5:30

विदर्भाच्या हाती सत्ता आहे. मात्र, त्यानंतरीह येथील नेत्यांना विदर्भाला न्याय देणे जमत नाही. त्यामुळे असे भाड्याने असे अणे आणायचे, त्यांच्या हातून विदर्भाचे तुणतुणे वाजविण्याचे प्रकार सुरू आहेत.

Hate to Vidarbhais - Nitesh Rane | विदर्भवाद्यांना फटके हाणू - नितेश राणे

विदर्भवाद्यांना फटके हाणू - नितेश राणे

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 24  : विदर्भाच्या हाती सत्ता आहे. मात्र, त्यानंतरीह येथील नेत्यांना विदर्भाला न्याय देणे जमत नाही. त्यामुळे असे भाड्याने असे अणे आणायचे, त्यांच्या हातून विदर्भाचे तुणतुणे वाजविण्याचे प्रकार सुरू आहेत. यापुढे आम्ही कुणाच्या वयाचाही विचार करणार नाही. आधी कानशिलात हाणू. नंतर वाटल्यास माफी मागू. संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्यावर कुणी नाडानाडी केली तर त्यांना फटके पडतील, अशी धमकीच स्वाभीमानी संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवाद्यांना दिली.

स्वाभीमानी संघटनेची प्रदेश बैठक बुधवारी रविभवन येथे झाली. यानंतर हिंदी मोर भवन सभागृहातत नाागपूर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा झाली. या सभेत आ. नितेश राणे यांनी गरळ ओकत विदर्भवाद्यांचे हात-पाय तोडण्याची भाषा केली.

Web Title: Hate to Vidarbhais - Nitesh Rane