शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सची भारी कामगिरी, सनरायझर्स हैदराबादने कशीबशी शंभरी ओलांडली
2
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

महापालिका रुग्णालयांतूनही मिळणार दिव्यांगत्व दाखला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 7:00 AM

राज्यात दृष्टीदोष (अंधत्व), शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुविकलांगता अशा सहा प्रवर्गासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जात होते.

ठळक मुद्देराज्यसरकारने सॉफ्टवेअर असेसमेंट फॉर डिसअ‍ॅबिलिटी महाराष्ट्र ही प्रणाली केली विकसितकेंद्र सरकारच्या २०११सालच्या जनगणनेनुसार राज्यात २९ लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्ती

-  विशाल शिर्के-  

पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांच्या केलेल्या नव्य २१ प्रवर्गानुसार दिव्यांगत्व प्रमाण वितरण करण्यास सुरुवात झाली असून, आता जिल्हा सरकारी रुग्णालयांबरोबरच पुणे, नागपूरसह सहा महानगरपालिकांच्या निवडक रुग्णालयात देखील दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे. या साठी महापालिका रुग्णालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यात दृष्टीदोष (अंधत्व), शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुविकलांगता अशा सहा प्रवर्गासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जात होते. त्यासाठी राज्य सरकारने सॉफ्टवेअर असेसमेंट फॉर डिसअ‍ॅबिलिटी महाराष्ट्र (एसएडीएम) ही प्रणाली विकसित केली होती. केंद्र सरकारने दिव्यांगत्व वर्गवारीत आणखी १५ प्रवर्ग समाविष्ट केल्याने दिव्यांग प्रवर्गाची संख्या सहा वरुन २१ इतकी झाली आहे. त्यासाठी स्वावलंबन कार्ड हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या माध्यमातून दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्यातील एसएडीएम ही प्रणाली बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या २०११सालच्या जनगणनेनुसार राज्यात २९ लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. नव्या प्रवर्गामध्ये वाचादोष, मज्जासंस्थेचे आजार अशा विविध वर्गवारींची भर घालण्यात आली आहे. त्यांना देखील दिव्यांग योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिकांची रुग्णालयांमधून दिव्यांगांच्या प्रकारानुसार दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, पीसीएमसी, ठाणे, नागपूर, नाशिक आणि बृहन्मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये ही सुविधा देण्यात येईल. पुण्यातील कमला नेहरु, पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम, औंधमधील जिल्हा रुग्णालय, ससून, तसेच मंचर येथील उपविभागीय रुग्णालयातून नव्या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्यात येतील. जिल्हा व सामान्य रुग्णालयातून दर आठवड्याच्या बुधवारी दिव्यांगत्व तपासणी आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरीत केले जाईल. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमधून शुक्रवारी तपासणी आणि प्रमाणपत्र वितरणाचे काम चालेल. दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी एखादी व्यक्ती पात्र नसल्यास त्याची कारणे नमूद करण्याची सूचना आदेशात करण्यात आली आहे. -----------------------कसा कराल अर्ज

दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी ६६६.२६ं५ं’ेंुंल्लूं१.िॅङ्म५.्रल्ल या संक्तेस्थळावर अर्ज करता येईल. आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा/महाविद्यालयाचे अ‍ेलखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड वाहन परवाना हा ओळख पुरावा, निवासासाठी लाईट बिल, मिळकर पावती, सात-बारा उतारा, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, घरपट्टी, पाणीट्टी, शिधापत्रिका या पैकी एक पुरावा लागेल. पासपोर्ट आकाराची नजीकच्या काळातील दोन छायाचित्रे.   

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल