Join us  

KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सची भारी कामगिरी, सनरायझर्स हैदराबादने कशीबशी शंभरी ओलांडली

सनरायझर्स हैदराबादची तगड्या फलंदाजांची मजबूत फळी आज पूर्णपणे अपयशी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 9:14 PM

Open in App

IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : सनरायझर्स हैदराबादची तगड्या फलंदाजांची मजबूत फळी आज पूर्णपणे अपयशी ठरली. मिचेल स्टार्कने मोक्याच्या सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध करताना कोलकाता नाईट रायडर्सला दमदार सुरुवात करून दिली अन् त्यानंतर अन्य गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख पार पाडली. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पॅट कमिन्सने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि शतकी पल्ला पार केला. 

आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय SRH च्या अंगलट आला. स्टार्कने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने पुन्हा निराश केले व राहुल त्रिपाठी ( ९) हाही फेल गेला. स्टार्कसोबत वैभव अरोरा व हर्षित राणा यांनी पहिल्या १० षटकांत उत्तम मारा करताना हैदराबादचा निम्मा संघ ६२ धावांत तंबूत पाठवला. आयपीएल फायनलमध्ये १००च्या आत ५ विकेट्स गमावूनही जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स ( २०१७) हा एकमेव संघ आहे. RCB 2009, RCB 2011, CSK 2013 व  RR 2022 यांना अपयश आले आहे. 

आंद्रे रसेलने सलग दोन षटकांत दोन विकेट्स घेऊन हैदराबादची दयनीय अवस्था केली. वरूण चक्रवर्थीन १२व्या षटकात शाहबाज अहमदला ( ८) बाद केले. हेनरिच क्लासेन ( १६) हा शेवटचा आशादायी फलंदाज मैदानावर उभा होता, परंतु हर्षितच्या चेंडूवर बॅटची किनार घेत तो त्रिफळाचीत झाला. पॅट कमिन्सचा सोपा झेल स्टार्कने टाकल्याने हैदराबादला शंभरीपार पोहोचता आले. आयपीएल फायनलनंतर विकेट मेडन टाकणारा हर्षित राणा ( १५ वे षटक) हा पहिला गोलंदाज ठरला. २०१९मध्ये दिपक चहरने मुंबई इंडियन्सविरुद्ध सहाव्या षटकात असा पराक्रम केला होता.  

कमिन्स व जयदेव उनाडकट ( ४) यांची २३ धावांची भागीदारी सुनील नरीनने तोडली. या सामन्यातील ही दुसरी सर्वोत्तम ( २६ धावा, नितीश रेड्डी व एडन मार्करम) भागीदारी ठरली.  रसेलने डावातील तिसरी विकेट घेताना पॅट कमिन्सला २४ धावांवर माघारी पाठवले. हैदराबादचा संपूर्ण संघ १८.३ षटकांत ११३ धावांत तंबूत परतला. 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स