शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जी १५ प्राध्यापकांवर कारवाई

By admin | Updated: June 8, 2017 00:58 IST

उत्तरपत्रिका वेळेत जमा न करणे आदी विविध परीक्षांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या १५ प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : परीक्षा मूल्यमापनाचे काम करताना विद्यार्थ्यांना चुकीचे गुण देणे, प्रश्नपत्रिकांचे अयोग्य वाटप करणे, अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारणे, उत्तरपत्रिका वेळेत जमा न करणे आदी विविध परीक्षांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या १५ प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना करिअर घडविताना एक -एक गुणासाठी तीव्र संघर्ष करावा लागत असताना, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना प्राध्यापकांकडून अक्षम्य हलगर्जीपणा केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार विद्यापीठ अधिकार मंडळाकडून संबंधित प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. आझम कॅम्प येथील अल्लाना महाविद्यालयाच्या अंतर्गत परीक्षक प्रीती डांगे यांच्यावर अंतर्गत मूल्यमापनाचे गुण १५० ऐवजी ७५ पैकी दिले, त्यामुळे या विषयास बसलेले सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. याप्रकरणी डांगे यांना पुढील एक वर्ष परीक्षेचे कामकाज पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे. मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल अँड केटरिंग टेक्नोलॉजीच्या संचालकांनी परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका वेळेत जमा न केल्यामुळे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्याची कारवाई केली आहे. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. सचिन व्यवहारे व कनिष्ठ पर्यवेक्षक डॉ. भारती कुमार उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर अनुक्रमांक लिहून, त्यानंतर त्यावर पांढरी शाई लावल्याचे आढळून आल्याने त्यांना परीक्षेतील कोणतीही जबाबदारी देण्यास ३ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. कात्रज येथील ट्रिनिटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे दादाराम जाधव व राजेंद्रप्रसाद पगारे यांची कायमस्वरूपी शिक्षा रद्द करीत तीन वर्षांची बंदी करण्यात आली आहे. अभियांत्रिकी पेपरफुटीचा अहवाल १५ दिवसांतअभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रश्नपत्रिका फुटून त्या व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या १५ ते २० दिवसांमध्ये प्राप्त होणार आहे. त्यानंतर संबंधितावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.उत्तरपत्रिका व पुरवणी उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर वेगवेगळे असल्याबाबत मराठवाडा मित्रमंडळमधील कनिष्ठ पर्यवेक्षक सचिन थोरे यांच्यावर परीक्षेचे कामकाज पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याबाबत डॉ. डी. वाय. पाटील स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या जाना देबश्री सैविक, सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे प्रा. अवधूत पोळ यांच्यावर एक वर्षासाठी परीक्षेचे कामकाज पाहण्यास बंदीची कारवाई केली आहे.