छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ हजार ५७२ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, बाजरी यासह आंबा, मोसंबी फळबागांना फटका बसला.
यात सर्वाधिक ८ हजार ४५५ हेक्टर क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. राज्यात १७ ते २२ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, अवकाळी पावसात पडलेल्या विजांमुळे विभागात दोघांचा मृत्यू झाला तर ४१ लहान-मोठी जनावरे दगावली. तर ५३३ गावांतील २० हजार ८९६ शेतकरी बाधित झाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानात ३३९७ हेक्टर जिरायत, ६९४४ बागायत तर १२२९ हेक्टर फळबागांचा समावेश आहे. पुढील एक ते दोन दिवस पावसाचा अंदाज आहे.
दोघांचा मृत्यूविभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार, गुलाब मसाराव मारकड (वय ३३, रा. पातोंडा, ता. जि. हिंगोली) आणि दीपिका संजय राठोड (वय अंदाजे १६, रा. शिळवणी, ता. देगलूर, जि. नांदेड) या दोघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
एकूण ४१ जनावरे मृत्युमुखीविभागात एकूण १८ मोठी, १५ लहान दुभती जनावरे, तर ओढकाम करणारी ७ मोठी आणि एका लहान जनावराचा अशा एकूण ४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?जिल्हा - बाधित शेतकरी संख्या - एकूण बाधित क्षेत्रछत्रपती संभाजीनगर - १५३०२ - ८४५५.७८जालना - २५६६ - १३६४.२०नांदेड - ५६ - ३४.२५बीड - २६२ - १५६लातूर - ९४ - ५२धाराशिव - २६१६ - १५०९एकूण - २०८९६ - ११५७२.१३
Web Summary : Untimely rain and hailstorms in Marathwada damaged crops across 11,572 hectares, impacting over 20,000 farmers in 533 villages. The hailstorm damaged wheat, gram, maize, and fruit orchards. Two deaths and livestock losses were reported. Further rainfall is expected.
Web Summary : मराठवाड़ा में असमय बारिश और ओलावृष्टि से 11,572 हेक्टेयर में फसलें बर्बाद हो गईं, जिससे 533 गांवों के 20,000 से अधिक किसान प्रभावित हुए। ओलावृष्टि से गेहूं, चना, मक्का और फलों के बागों को नुकसान पहुंचा है। दो लोगों की मौत और पशुधन की हानि हुई। आगे भी बारिश की संभावना है।