शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

व्यावसायिकाच्या पुत्रवियोगाच्या दुःखाचा ‘हॅकर्स’कडून गैरफायदा, बोगस ‘फेसबुक’ अकाऊंट बनवून होतेय पैशांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 06:42 IST

गौरी टेंबकर - कलगुटकर - मुंबई : 'मला ५० हजार रुपयांची गरज आहे. फोन पे किंवा गुगल पेवरून पाठवशील ...

गौरी टेंबकर - कलगुटकर -मुंबई : 'मला ५० हजार रुपयांची गरज आहे. फोन पे किंवा गुगल पेवरून पाठवशील का?' असा मेसेज मालाडच्या चेतन महोवियांना व्यावसायिक विजय सिंह यांच्या 'फेसबुक' मेसेंजरवरून मिळाला. विजय यांच्या तरुण मुलाचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे. त्यामुळे महोविया यांनी याबाबत त्यांच्या भावाशी बोलणे केले आणि त्यांनी पैसे मागितलेच नसून सदर मेसेज हा 'बोगस' अकाऊंटवरून आल्याचे उघड झाले. त्यावरून हॅकर आता एखाद्याच्या दुःखाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचे पुढे आले आहे.

विजय सिंह यांचा मुलगा राजन सिंह (३७) याचे गेल्या महिन्यात २५ जून, २०२१ रोजी कोरोनाने निधन झाले. त्याच्या पश्चात वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अशा अचानक जाण्याने विजय याना जबर मानसिक धक्का बसला आहे. राजनच्या निधनाची पोस्ट त्यांचे लहान बंधू अजय सिंह यांनी फेसबुकवर टाकली होती. हे कुटुंबीय राजनच्या अंत्यविधीसाठी गावी गेले आहे. त्याचा फायदा हॅकरने उचलत विजय यांच्या नावाने बोगस अकाऊंट तयार केले आणि अनेकांना मेसेंजरवर मेसेज टाकत पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यापैकीच महोविया हे एक होते.

... म्हणून मी पैसे दिले नाहीतमला विजय सिंह यांचा फोटो आणि ९६९४६४३३४२ या अनोळखी क्रमांकावरून मेसेज करत ५० हजार रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. मात्र, मला थोडा संशय आल्याने मी अजय सिंह याना फोन केला. तेव्हा अशी काही मागणीच करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे महोविया यांनी सांगितले.

फेक पोस्ट पडताळणीसाठी  आता 'समाधान ऍप' फेसबुक खाते हॅक करत त्याद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले असून आमचे त्यावर लक्ष आहे. आतापर्यंत अनेक प्रकरणांचा छडा आम्ही लावला आहे.  खाते हॅक झालेच तर त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. जेणेकरून त्यांना पोलिसांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. तसेच 'समाधान ऍप' मार्फतही अशा बोगस खात्यांची विश्वासार्हता पडताळता येईल.- सरला वसावे, पोलीस निरीक्षक, समतानगर सायबर सेल प्रमुख. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाbusinessव्यवसायPoliceपोलिस