आठ लाखांचा गुटखा पकडला

By Admin | Updated: May 26, 2014 02:58 IST2014-05-26T02:58:17+5:302014-05-26T02:58:17+5:30

निक गुन्हा अन्वेषण शाखेने सुमारे आठ लाख रुपयांचा गुटखा पकडून गुजरातेतून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे होत असलेली गुटख्याची तस्करी रोखली

Gutkha caught eight lakhs | आठ लाखांचा गुटखा पकडला

आठ लाखांचा गुटखा पकडला

धुळे : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सुमारे आठ लाख रुपयांचा गुटखा पकडून गुजरातेतून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे होत असलेली गुटख्याची तस्करी रोखली. शनिवारी मध्यरात्रीनंतर महामार्गावरील बिलाडी फाटा येथे ही धडक कारवाई करण्यात आली. चालक आणि क्लिनर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचण्यात आला. मध्यरात्रीनंतर या मार्गावर एका ट्रकची तपासणी केली असता ७ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीचा गुटखा सापडला. या प्रकरणी चालक निखिल पद्माकर गावंडे व क्लिनर मोहमद साजिद मोहमद सादीक यांना ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Gutkha caught eight lakhs