This is a guest government; They not run long! - Narayan ranane | हे पाहुणे सरकार; ते फार काळ टिकणार नाही! नारायण राणेंचा टोला 
हे पाहुणे सरकार; ते फार काळ टिकणार नाही! नारायण राणेंचा टोला 

कणकवली/मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडी सरकारवर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेमधून नव्या सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फारकाळ टिकणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केवळ स्वार्थापोटी एकत्र येत हे सरकार स्थापन केले आहे,'' असे नारायण राणे म्हणाले. 

यावेळी गेल्या काही दिवसांत सरकारने विविध विकासकामांना दिलेल्या स्थगितीवरूनही  नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली. ''सरकारकडून विविध विकासकामांना स्थगिती दिली जात आहे. सत्ता बदलल्यानंतर कोकणातील विविध विकासकामे ही ठप्प झाली आहेत. त्यामुळे या सरकारचे स्थगिती सरकार असे नामकरण करता येईल,'' असा टोला राणेंनी लगावला. 

जिल्ह्यात आढावा बैठका घेणार खासदार विनायक राऊत यांच्यावरही राणेंनी जोरदार टीका केली. शिवसेना आता सत्तेत नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी कोणत्या अधिकारांमध्ये जिल्ह्यात आढावा बैठक घेतली. सत्तारुढ पक्षाचे खासदार नसताना त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना कोणत्या अधिकारात आदेश दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच बेकायदेशीर बैठका घेऊन शिवसेनेकडून काम करत असल्याचा भास निर्माण केला जात आहे, असेही राणे म्हणाले. 

''राज्यात तीन पक्षांना एकत्र येत स्थापन केलेले सरकार हे कसे उपयुक्त नाही याची माहिती आम्ही जनतेला देणार आहोत. त्यासाठी 15 ते 18 डिसेंबरदरम्यान गाव बैठका घेणार आहोत, असेही राणेंनी सांगितले. तसेच क वर्ग देवस्थांना मिळणाऱ्या निधीला स्थगिती देण्याचा निर्णयाला आम्ही विरोध करू, तसेच विकासाबाबतचा अन्यायही सहन करून घेणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. 
 

Web Title: This is a guest government; They not run long! - Narayan ranane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.