शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत

By admin | Updated: September 26, 2014 23:29 IST

राष्ट्रवादीला धक्का : रत्नागिरीतून लढणार

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे रत्नागिरीचे आमदार असलेले व गेल्या वर्षभरापासून जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असलेले उदय सामंत यांनी अखेर आज, शुक्रवारी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ केला. राष्ट्रवादीतील अंंतर्गत वाद व लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राज्यातील राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर ते रत्नागिरीतून निवडणूक लढविणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. सामंत यांच्या निर्णयाने रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासूनच उदय सामंत कार्यरत होते. त्यांच्याकडे प्रथम पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर २००४ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना विधानसभेची रत्नागिरीची उमेदवारी दिली. रत्नागिरीतून भाजप उमेदवार बाळ माने यांचा पराभव करून ते निवडून आले. त्यानंतर त्यांच्या विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांची दखल घेत पक्षाने त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपविल्या. २००९ मध्ये ते पुन्हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यावेळी त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्नही केले. मात्र, राज्यस्तरीय पक्षीय गटबाजीत त्यांना मंत्रिपद मिळणे कठीण बनले होते. पुनर्वसन म्हणून त्यांना युवक प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.सामंत यांच्यानंतर काही वर्षांनी सेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या चिपळूणमधील भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळाले. मात्र, आपणास डावलले गेल्याचे शल्य त्यांच्या मनात बोचत राहिले. त्यातून जिल्ह्यात जाधव विरुद्ध सामंत अशी गटबाजी रंगली. आपल्याला नाहक त्रास दिला जात असल्याची भावना सामंत यांच्या मनात निर्माण झाली. त्यातच मंत्रिपदही मिळत नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या सामंत यांनी तेव्हापासूनच शिवसेनेतील त्यांचे मित्र राजन साळवी यांच्या माध्यमातून सेनेशी जवळीक साधण्यास सुरुवात केली होती.मातोश्रीवर जाऊन आल्याच्या वृत्ताचा सामंत इन्कार करत राहिले. आपल्या पराभवासाठी पक्षातीलच काहीजण जोराचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला होता. सामंत यांची पक्षात कोंडी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांचे समर्थकही करीत होते. त्यातच राज्यात आघाडी व युतीही तुटली. त्यामुळे या संधीचा लाभ घेत व पक्षांतर्गत विरोधकांना धक्का देत सामंत यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. (प्रतिनिधी)