शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना वाढ

By admin | Updated: June 2, 2014 06:37 IST

८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या मूळ निवृत्तीवेतनात १ एप्रिल २०१४ पासून १० टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

मुंबई : ८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या मूळ निवृत्तीवेतनात १ एप्रिल २०१४ पासून १० टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य शासन, जिल्हा परिषद तसेच कृषी आणि अन्य शैक्षणिक संस्थांतून निवृत्त झालेल्या सुमारे एक लाख सेवानिवृत्तीधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. संघटनांकडून वारंवार याबाबत मागणी करण्यात येत होती. सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने ही वाढ केली असूण त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला १० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. वाढती महागाई व वृद्धत्वामुळे आजारपणावर होणारा खर्च लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना १ एप्रिल पासून वाढीव वाहतूक भत्ता देण्याचा, तसेच अंध, अपंग कर्मचार्‍यांचा वाहतूक भत्ता दुप्पट केला आहे. ५४०० रुपये अथवा अधिक गे्रड पे असणार्‍या कार्मचार्‍यांना अ-१ व अ वर्गातील शहरांसाठी २ हजार ४०० रूपये तर इतर ठिकाणांसाठी दरमहा १ हजार २०० रूपये तर ४४०० ५४०० रुपये ग्रेड पे असणार्‍या कर्मचार्‍यांना अ-१ व अ वर्ग शहरांसाठी १ हजार २०० रुपये तर इतर ठिकाणांसाठी ६०० रुपये व ४४०० पेक्षा कमी ग्रेड पे असणार्‍या कर्मचार्‍यांना सर्व शहरांसाठी ४०० रुपये असा वाहतूक भत्ता देण्यात येईल. तसेच अंध, अस्थिव्यंग आणि पाठीच्या कण्याच्या विकाराने पीडित असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना दुप्पट वाहतूक भत्ता दिला जाईल. ५४०० रुपये किंवा त्याहून अधिक ग्रेड पे असलेल्या कर्मचार्‍यांना अ-१ व अ वर्ग शहरांसाठी ४ हजार८०० रुपये तर इतर ठिकाणांसाठी २ हजार ४०० रुपये दरमहा देण्यात येतील. ग्रेड पे ४४०० ते ५४०० रुपये असणार्‍या कर्मचार्‍यांना अ-१ व अ शहरांसाठी २ हजार ४०० रुपये तर इतर ठिकाणांसाठी २००० रुपये व ४४०० पेक्षा कमी ग्रेड पे असणार्‍यांना सर्व शहरांसाठी २००० रूपये वाहतूक भत्ता देण्यात येईल.